yuva MAharashtra माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सांगली काँग्रेसने वाहिली श्रध्दांजली !

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सांगली काँग्रेसने वाहिली श्रध्दांजली !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ डिसेंबर २०२
भारताचे माजी पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानिमित्त काल काँग्रेस भवनमध्ये आयोजित त्यांच्या प्रतिमेला जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील व प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेल कार्याध्यक्ष प्रा. एन.डी.बिरनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पणाने अभिवादन करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

स्वागत व प्रास्ताविक काँग्रेस सेवा दल जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले. यावेळी ऋतुराज पाटील, संभाजी पाटील, प्रा. एन.डी.बिरनाळे, बिपीन कदम, मालन मोहिते, अनिल मोहिते, देशभूषण पाटील, सिध्देश्वर चेंडके, यांनी स्व. डॉ. मनमोहन सिंग यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन श्रध्दांजली वाहिली.


यावेळी विजय नवले, सचिन चव्हाण, अरुण पळसुले, बाबगोंडा पाटील, मौला वंटमुरे, विठ्ठलराव काळे, अल्ताफ पेंढारी, रविंद्र वळवडे, सुरेश कांबळे, गणेश वाघमारे, माणिक घोलप, राजेश शिंदे, सुरेश गायकवाड, श्री खांडेकर व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.