yuva MAharashtra 'त्या' मजूर संस्था व ठेकेदार यांच्या फौजदारी दाखल करण्यासाठी महापालिका शहर अभियंत्यांनी केली फिर्याद दाखल !

'त्या' मजूर संस्था व ठेकेदार यांच्या फौजदारी दाखल करण्यासाठी महापालिका शहर अभियंत्यांनी केली फिर्याद दाखल !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ डिसेंबर २०२
शुभम गुप्ता आयुक्त यांनी बांधकाम विभागाकडील शहर अभियंता यांच्या खोट्या सहीने देयके सादर करून बिल मागणी करणाऱ्या ठेकेदार व मजूर संस्था यांच्यावर कारवाई चे केले आदेश दिले होते. त्या नुसार कार्यवाही करण्यात आली असून अतिरिक्त आयुक्त त्यांच्या अध्यक्षखाली विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहवाल
सादर करण्यात आला होता.

जोगेश्वरी मजूर सह. संस्था मर्या, सांगलीवाडी,. संग्राम मजूर सह. संस्था मर्या, जुनी धामणी, अक्षय दोडमनी, श्री. वृषभ भागवत रोकडे यांनी मिरज येथील ६ कामात साधारणपणे ५० लाख रकमेची वार्ड क्र 5 व 20 मधील कामे असून सदर कामाची मोजमापे आणि देयके शहर अभियंता यांच्या खोट्या सहीने ऑडिट विभागाकडे सादर केली आहेत. ही बाब निदर्शनास आल्या नंतर याकामी अहवाल सादर करण्यात आला होता.


मा आयुक्त शुभम गुप्ता यांनी संबंधितावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या नुसार मा शहर अभियंता यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.