| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. २० डिसेंबर २०२४
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून महायुतिचे उमेदवाराचे मा. सुधीरदादा गाडगीळ यांच्यावर 'मौनी आमदार' म्हणून टीका केली गेली होती. काल नागपूर येथील अधिवेशनात विकास आराखड्याच्या नकाशाअभावी सांगली महापालिका क्षेत्राचा विकास रखडल्याबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांना चोख उत्तर दिले आहे.
यावेळी विधानसभेत बोलताना आ. सुधीर दादा म्हणाले की सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील विकास कामे व नवीन अर्ध कामे विकास आराखड्याच्या नकाशा अभावी कोळंबली आहेत. यामुळे नागरिकातून प्रचंड असंतोष दिसून येत आहे. त्यामुळे अधिसूचनेतील दोन्ही नकाशे अंतिम करून मंजुरी द्यावी अशी मागणी केली.
यावेळी हा मुद्दा अधिक गंभीरतेने मांडताना आ. गाडगीळ म्हणाले की, महानगरपालिका मंजूर फेरबदलांच्या विकास योजनेचे अधिसूचना दि. 4 एप्रिल 2012 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. त्यानंतर दि. 2 जानेवारी 2015 रोजी नगर विकास खात्याकडून शुद्धलेखनाकडे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यावरील हरकती व सूचनांचा विचार होऊन, दि. 30 मार्च 2016 रोजी सार्वभौत स्वरूपाच्या फेरबदलांचे अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. वास्तविक पाहता या दोन्ही अधिसूचनांच्या प्रसिद्धी सोबतच त्यांचे विकास योजना नकाशेही प्रसिद्ध होणे गरजेचे होते. पात्र अद्यापही हे दोन्ही नकाशे प्रकाशित होऊ शकल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच या दोन्ही नकाशाच्या शासन निर्णयामध्ये काही त्रुटी युवा विसंगती आहेत. दुसऱ्या शुद्धिपत्रकाचा प्रस्ताव नगर विकास विभागाने मंत्रिमहोदायांच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. हा प्रस्ताव मागील बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकास कामे खोळंबली असून तीनही शहरांच्या विकासावर परिणाम झाला आहे. सबब हे दोन्ही विकास आराखडय़ाचे नकाशे विनाविलंब प्रसिद्ध करावीत अशी मागणी आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी विधानसभेतील औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली आहे.