yuva MAharashtra श्रीमती रूपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांची मनपास भेट !

श्रीमती रूपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांची मनपास भेट !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ डिसेंबर २०२
श्रीमती रूपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेस सदिच्छा भेट दिली.

मा शुभम गुप्ता आयुक्त मनपा यांनी स्वागत केले. उप आयुक्त विजया यादव, पृथ्वीराज चव्हाण शहर अभियंता, सहा आयुक्त डोईफोडे, सचिन सांगावकर, प्रज्ञा त्रिरण ,अनिस मुल्ला, विनायक शिंदे, डॉ रवींद्र ताटे, डॉ.वैभव पाटील सुनील पाटील , सर्व विभाग प्रमुख या वेळी उपस्थित होते, 


श्रीमती रूपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी यावेळी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या कामकाज बाबत समाधान व्यक्त केले. मा आयुक्त आणि त्यांच्या टीम यांचे अभिनंदन केले. तसेच श्रीमती रूपाली चाकणकर यांनी 
 मनपा क्षेत्रातील गर्भनिदन केंद्रास भेट देऊन तेथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

महिला स्वच्छता गृह नव्याने उभे करून, जे आहेत त्यांची दुरुस्ती करून घ्यावी, अशी सूचना दिल्या आहेत. नाले सफाई स्वच्छता या वर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्या बाबत सूचना दिल्या.
 
यावेळी माजी महापौर, दिग्विजय सूर्यवंशी, प्रा. पद्माकर जगदाळे, जिल्हा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष, विष्णू माने, उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे, श्रीमती जयश्री पाटील, जिल्हा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष, जमिल बागवान अध्यक्ष शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस, बिरेंद्र थोरात, अत्तहर नायकवडी, सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

यावेळीं मा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते मा.श्रीमती रूपाली चाकणकर यांचा सत्कार करण्यात आला.