| सांगली समाचार वृत्त |
श्रवणबेळगोळा - दि. २ डिसेंबर २०२४
कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील विकासाचे जनक कर्मयोगी जगद्गुरु चारूकिर्ती पंडिताचार्य भट्टारक भट्टाचार्य महास्वामी यांचे स्मारक भट्टारक निषिधी पर्वत चंद्रगिरी जवळ श्री शेत्र श्रवणबेळगोळ येथे सहा डिसेंबर रोजी समाधी मंडप लोक लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती परमपूज्य जगदुरु स्वस्तिश्री अभिनव चारूकिर्ती भट्टारक पंडिताचार्य भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
श्रवणबेळगुळा येथे आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलताना त्यांनी सांगितले की, २३ मार्च रोजी स्वामीजींचे समाधी मरण झाले त्यानंतर त्यांचं स्मारक उभे करण्याचा निर्णय झाला होता. केंद्र सरकारकडून त्याला मंजुरी घेऊन हे स्मारक उभे केले आहे. या कार्यक्रमासाठी जैन समाजाचे १४ भट्टारकांच्यासह राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. भट्टारक परमपूज्य जगदूरु स्विस्तश्री अभिनव चारूकिर्ती पंडिताचार्य भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी पुढे म्हणाले की, आदी चुनचुनगिरी महासंस्थान मठाचे डॉक्टर निर्मलानंदनाथ स्वामीजी श्री पेजावर मठ उडपी विश्व प्रसन्न तीर्थ श्री पादंगलजी श्री सिद्धगंगा मठ तुमकुरचे सिद्धलिंग महास्वामीजी आदी चुनचुनगिरी महासंस्थान शाखा मठ हसनचे शंभुनाथ स्वामीजी हे उपस्थित राहणार असून, प.पू. जगद्गुरु स्वस्तिश्री अभिनव चारूकिर्ती पंडिताचार्यवर्य भट्टारक पट्टाचार्यवर्य महास्वामिजी, धर्माधिकारी डॉक्टर वीरेंद्र हेगडे हेही उपस्थित राहणार आहेत.
लोकार्पण समारंभास कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी माजी पंतप्रधान एचडी देवेगोडाजी, केंद्रीय मंत्री एचडी कुमार स्वामीजी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री श्री एम वीरप्पा मोहिलीजी व विद्यमान मंत्री असलेले सुधाकरजी श्रीयुत के एन राजना दाजी यांच्यासह खासदार श्रेयस पटेल, आमदार सीएम बालकृष्ण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अभिनव चारूकिर्ती महाराज पत्रकार बैठकीत पुढे म्हणाले की, १९७० ते २०२३ या कालखंडात श्रवणबेळगोळ विकास त्यांनी केलाह अनेक भक्तजनांचे ते गुरु आणि श्रवणबेळ परिसराचे विकासकर्ते धवलाग्रंथाचे अनुवाद करून प्रकाशन त्यांनी केले. प्राकृत भाषा जनकल्याणक्य ठरले. चंद्रगिरी महोत्सवाचे ते प्रवर्तक होते, तसेच त्या परिसरातील ४० मंदिराचा जिर्णोद्धारही त्यांनी केला. तीर्थ संरक्षक पंतरहित संत परमस्तृतभक्त शिक्षा प्रेमी उत्तर दक्षिण भारत जैन समाजाचे धर्म प्रभावना करण्यास पुढे असणारे परमपूज्य जगद्गुरु कर्मयोगी चारुकीर्थी पंडिता चार्यौर्य महास्वामीजी यांची अंतिम क्रिया ज्या निषेधि पर्वतावर केली गेले त्याच स्थानावर शिलामय निशिधी मंडप व श्री चरण चिन्ह प्रतिष्ठित संस्मरण शिलालेख उभा करण्यात आला असून लोकार्पणाचा हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता संपन्न होणार असल्याचेही त्यांनी सांगून या अशा संस्मरणीय कार्यक्रमास सहभागी होण्याची ही आव्हान परमपूज्य जगदुरु स्वस्तिश्री अभिनव चारूकिर्ती भट्टारक पंडिताचार्य भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी केले आहे.