yuva MAharashtra सांगली शिक्षण संस्थेच्या सुकन्या हलगी व लेझीम तालातून दिल्लीश्वरांना ठेका धरायला लावणार !

सांगली शिक्षण संस्थेच्या सुकन्या हलगी व लेझीम तालातून दिल्लीश्वरांना ठेका धरायला लावणार !

            फोटो सौजन्य  : दै. केसरी

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० डिसेंबर २०२
कबड्डी, खो-खो या खेळासह लेझीम ही सुद्धा सांगलीची ओळख. हल्लीचा ताल आणि लेझीमचा झणझणात सुरू झाला की, पाहणारा त्यावर ठेका धरल्याशिवाय राहत नाही. आता सांगलीची ही ओळख सांगली शिक्षण संस्थेच्या 18 सुकन्या विश्वविक्रमी लेझीमच्या माध्यमातून दिल्लीश्वराला ठेका धरायला लावणार आहेत... 26 डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत मंडप कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत लेझीमचे प्रदर्शन सादर करणार आहेत. त्यामुळे सांगलीचे नाव देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात आणखीन एकदा दुमदुमणार आहे.
याबाबतची माहिती सांगली शिक्षण संस्थेचे कार्यवाहक शि. वा. गोसावी, संचालक व क्रीडा भारतीचे अध्यक्ष विजय भिडे, मागे अध्यक्ष नितीन खाडीलकर व अमोल करंदीकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

याबाबत अधिक माहिती देताना गोसावी व खालील कर यांनी सांगितले की, 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडच्या वेळी ही सांगली शिक्षण संस्थेतील 80 मुलींच्या संघाला लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक सादर करण्याचा बहुमान आहे मिळाला आहे.

वीर बाल दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नवी दिल्लीत भारत मंडपम हा महोत्सव 26 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. यासाठी क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र आणि सांगली शिक्षण संस्था यांच्या वतीने महाराष्ट्रातून लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक होणार आहे. यासाठी सांगली शिक्षण संस्थेतील 16 मुलींचा संघ, एक संघप्रमुख, चार वादक व एक व्यवस्थापक असा 24 जणांचा संघ नुकताच दिल्लीला रवाना झाला आहे.

यावेळी अधिक माहिती देताना श्री विजय भिडे म्हणाले की, लेझीम हा एक असा क्रीडा प्रकार आहे ज्यामुळे शरीराच्या पायापासून ते डोक्याच्या केसापर्यंत व्यायाम होतो. यातून करमणूकही होते. चांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त 2012 रोजी लेझीम खेळ प्रकारात साडेसात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन एक विश्वविक्रम नोंदविला होता. यामुळे हजारो सामग्रीकरांच्या साक्षीने सांगलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला होता. असा हा लेझीमचा खेळ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर होणार आहे. 

यावेळी संघ प्रमुख हरिहर भिडे, वादक माया खटके, शंतनु ताम्हणकर, अथर्व कांबळे, बिंदू माधव जिंदगी, व्यवस्थापक सचिन गद्रे, यांच्यासह श्रेया जोशी, निर्झरा माळी, ईश्वरी शिकलगार, कृतिका माने, वेदा कुलकर्णी, प्रीती चव्हाण, श्रुतिका चव्हाण, संस्कृती शिंगे, सिद्धी माळकर, श्रुती भांडवले, नांदवडेकर, भार्गवी सगरे, पायल यमगर, साक्षी कुलकर्णी, भाग्यश्री माळी, हर्षदा शिंदे, अन्विता पाटील अशा विद्यार्थ्यांनी सहभागी होणार आहेत.