| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ डिसेंबर २०२४
सांगलीतील झुलेलाल चौक हा नेहमीच गजबजलेला. जेथून कोल्हापूर कडे व सांगली शहरात जाणाऱ्या वाहनांचा मोठा राबता. सध्या मध्यवर्ती एसटी स्थानकामधील बस पार्किंगचे काँक्रिटीकरण सुरू असल्यामुळे, याच चौकातून बसेस बाहेर पडत असतात. परंतु येथील खाद्य वस्तूंचे स्टॉल आणि फळ विक्रेत्यांच्या हात गाड्यांनी तसेच वडाप रिक्षावाल्यांनी अर्धा चौक व्यापलाने मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचे कोंडी होत आहे.
वास्तविक या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक होणे आवश्यक असताना, त्याकडे डोळेझाक केली जात आहे. या अतिक्रमणाचा वाहन चालकांना व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले व वृद्धांना येथून जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. अनेकदा वाहन चालक, बस चालक आणि रिक्षावाल्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. मध्यंतरी प्रसार माध्यमाने याकडे लक्ष वेधल्या नंतर महापालिका अतिक्रमण विभागाने एक दिवशीय अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. त्यानंतर याकडे अतिक्रमण विभागाने हे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
सांगलीचे लोकप्रिय जिल्हा पोलीस प्रमुख आणि वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी येथील अतिक्रमणाकडे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ज्याप्रमाणे सांगली शहरातील शिवाजी मंडई परिसरात एका निरपराध नागरिकाला आपला प्राण कमवावा लागला, तसाच दुर्दैवी प्रसंग या झुलेलाल चौकात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.