yuva MAharashtra बंडखोरीमुळेच पृथ्वीराज पाटील यांचापराभव, खा. विशाल पाटील यांनी व्यक्त केली खंत !

बंडखोरीमुळेच पृथ्वीराज पाटील यांचापराभव, खा. विशाल पाटील यांनी व्यक्त केली खंत !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ डिसेंबर २०२
सांगली विधानसभा निवडणुकीत जयश्रीवहिनी पाटील यांनी उभे राह नये, यासाठी आपण अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. जनतेच्या मनात काय आहे ? हे सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आपणास अपयश आले. कुटुंब म्हणून त्यांच्यामागे उभे राहणे ही आपली जबाबदारी होती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील पराभूत झाले असल्याने त्यांना वाईट वाटणे, तसेच त्यांनी नाराजी व भावना व्यक्त केल्या आहेत, हे समजू शकतो. यापुढील काळात असे होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करू, असे मत सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्त केले.


सांगली येथील काँग्रेसचे पराभूत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी खा. विशाल पाटील यांनी भाजपा उमेदवाराला विजयी करण्यासाठी त्यांना मदत केली असा आरोप मुंबईत केला होता. त्याबाबत खुलासा करताना विशाल पाटील बोलत होते.

यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी आपण संसदेत ११ विषयांवर चर्चेत भाग घेतला तसेच २५ विविध प्रश्न मांडले. ३ खासगी विधेयके सादर केली असून त्यात निवडणूक आयुक्त नियुक्तीबाबत सदस्य नेमताना राज्यसभेचा विरोधीपक्ष नेते व सरन्यायाधीश यांचाही समावेश व्हावा, असेही म्हटले आहे. आत्ता केवळ पंतप्रधान, लोकसभेतील विरोधीपक्ष नेता आणि संबंधी खात्याचा मंत्री अशी समिती आहे. दुसरे विधेयक वन्य प्राणी संरक्षण सुरक्षतेबाबत असून तिसरे विधेयक पत्रकार संरक्षणाबाबत आहे, असेही ते म्हणाले.

टेंभू आणि म्हैशाळ विस्तारीत योजनेला जल आयोगाचा मान्याता मिळावी, अशी मागणी केली असून कवलापूरला विमानतळ व्हावे यासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री राम नायडू यांची भेट घेतली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच केंद्र आणि राज्य सरकारची पाहणी समिती येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

सांगली जिल्ह्यात मिरज ते विटा आणि कराड ते पंढरपूर हे दोन नवे रेल्वे मार्ग व्हावेत, यासाठीही आपण रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिले असून सांगली कोल्हापूर रस्त्यासाठी आचारसंहितेपूर्वी १२०० कोटी रूपये मंजूर झाले असून निवेदा प्रक्रिया लवकरच होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

शक्तीपीठ मार्गाबाबत सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांची सकारात्मक मागणी असून मिरज आणि तासगावमध्ये या मार्गाला विरोध आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने योग्य नुकसानभरपाई देऊन यातून मार्ग काढावा, अशी आपली भूमिका आहे, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात एआय हॅब तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असेही ते म्हणाले.