yuva MAharashtra राजेवाडी जलसेतूचे काम २ वर्षे रखडले, कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका, आ. सुहास बाबर यांची मागणी !

राजेवाडी जलसेतूचे काम २ वर्षे रखडले, कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका, आ. सुहास बाबर यांची मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
नागपूर दि. २२ डिसेंबर २०२
ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावाच्या पुजारवाडी हद्दीतील जलसेतूचे काम दोन वर्षे रखडले आहे. त्यामुळे राजेवाडी, दिघंची आणि लगतच्या गावांना पाणी मिळेनासं झालं आहे. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका. नवीन कॉन्ट्रक्टर नेमून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आणि औचित्याचा मुद्दा आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत उपस्थित केला.

आमदार सुहास बाबर यांच्या पाठपुराव्याने इतिहासात पहिल्यांदाच राजेवाडी तलावात उरमोडी व जे कटापूर योजनेचे पाणी आले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. परंतु पुजारवाडी येथील जलसेतूचे काम ठेकेदाराने अर्धवट व अपूर्ण ठेवल्याने या भागातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिला आहे.


जलसेतू काम रखडल्याने राजेवाडी तलवातील पाण्याचा लाभ पुजारवाडी, पांढरेवाडी, दिघंची, उंबरगांव, खवासपूर गावातील शेतकऱ्यांना मिळत नाही. हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी आमदार बाबर यांनी केली. आटपाडी ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट असलेले शेंडगेवाडी गांव आटपाडी नगरपंचायत मधून वगळले आहे. त्यामुळे शेंडगेवाडीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत करावी अशी मागणी आमदार बाबर यांनी केली. छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबीत आहे. हे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे अशी सुहास बाबर यांनी केली.