yuva MAharashtra सांगली अर्बन बँकेच्या शानदार दिनदर्शिकेचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन संपन्न !

सांगली अर्बन बँकेच्या शानदार दिनदर्शिकेचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन संपन्न !


फोटो सौजन्य : दै. ललकार, सांगली

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ डिसेंबर २०२
सांगली अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या शानदार दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा बँकेच्या प्रधान कार्यालया मधील स्व अण्णा गोडबोले सभागृह येथे नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. चांगली अर्बन बँकेचे संस्थापक स्व. म. ह. तथा अण्णा गोडबोले यांच्या स्मृतिदिनी प्रतिवर्षी बँकेतर्फे शानदार दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते.


यावेळी अविनाश धर्माधिकारी, आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे, आ. सुधीरदादा गाडगीळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक सुधीर चापोरकर, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, उपाध्यक्ष सी. ए. श्रीपाद खरे, संचालक सी. ए. अनंत मानवी, एच. वाय. पाटील, विश्वास चितळे, शैलेंद्र तेलंग, संजय पाटील, संजय धामणगावकर, रवींद्र भोकरे, मनोज कोरडे, स्वाती करंदीकर, कालिदास हरिदास, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक इत्यादीसह . बँकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.