| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ डिसेंबर २०२४
सांगलीतील सराफ कट्टा या ठिकाणी सराफ कट्टा मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सराफ कट्टा मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष सुनील पिराळे व राज्य प्रवक्ते संतोष पाटील तसेच सराफ कट्टा ग्रुपच्या सर्व सदस्याच्या उपस्थितीत नितीन काका शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य,सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह व कबड्डी क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून उल्लेखनीय काम केलेले, शेकडो कबड्डी क्षेत्रातील मुलांचे करिअर घडवणारे व आमचे मार्गदर्शक नितीन काका यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन साजरा करीत आहे, याचा मला आनंद आहे गेल्या 30 वर्षापासून महापालिकेमध्ये विविध खात्याचा पदभार स्वीकारून जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडले. त्याठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केली, महापालिकेला वेगवेगळ्या विभागातून कर स्वरूपात महापालिकेची तिजोरी रिकामी असताना त्या ठिकाणी कर वसुलीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवून कोट्यावधी रुपयाचा फायदा महानगरपालिकेला करून दिला.
महानगरपालिकेमध्ये क्लर्क म्हणून सुरुवात केले होती, परंतु निवृत्त होण्याच्या अगोदर काही वर्ष त्यांना महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून काम करण्याचा मान मिळाला. याचाच अर्थ केलेल्या कामाची पोचपावती महानगरपालिकेने देऊन त्यांच्या कामकाजाचा सन्मान केला होता. या पुढेही काकांनी आपल्या अनुभवाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना करून देण्यासाठी महापालिकेत त्यांना या भागातील नागरिकांनी निवडून देऊन नगरसेवक करावे असे आवाहन राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी सुधाकर नार्वेकर, रणजीत भैय्या चव्हाण, राजुशेठ पेंडुरकर, नकुल जकाते, जिमगे अण्णा, सावकार शिराळे, अशोक मालवणकर, चंद्रकांत मालवणकर, विजय देसाई, सुरेश तात्या जाधव, शैलेंद्र मामा शिंदे, गजानन पोतदार, संजय काळेबेरे, बी एम महाडिक, विशाल नार्वेकर, संजय कुरनेकर, रवींद्र पोतदार, संजय फल्ले, सतीश निंबाळकर व इतर मान्यवर यांनी नितीन काका शिंदे यांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.