| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ डिसेंबर २०२४
सांगली शहरातील मध्यवर्ती बस स्थानक म्हणजे नेहमी गजबजलेले ठिकाण. शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची येथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. विशेषतः शासनाने बस दरामध्ये महिला व वरिष्ठ नागरिकांना सवलत दिल्यामुळे महिलांची गर्दी अधिक असते. बस मध्ये चढताना व उतरताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्स मधून दागिने, पैसे, मोबाईल चोरीचे प्रकार नेहमीच घडत असतात.
सध्या बस स्थानकाचे नूतनीकरण सुरू असल्याने, अर्ध्याहून अधिक बस स्थानक दुरुस्तीसाठी बंद आहे. यामुळे उर्वरित जागेतूनच बस वाहतूक सुरू असते. ही जागा तशी तोकडी असल्याने, व प्रवाशांना अपेक्षित असलेली बस नेमके कुठे लागणार याची पहिल्यांदा माहिती नसते. बस लागल्यानंतर प्रवासाला त्याची कल्पना दिली जाते. अशावेळी प्रवाशांचे धावपळ होत आहे. बस मध्ये चढण्यासाठी प्रवाशांचे चढाओढ असते. याचाच फायदा घेऊन चोरटे हात की सफाई करीत असतात. यामधील अनेक गुन्ह्यांचा लावण्यास पोलिसांना अपयश आल्याचे प्रवाशातून बोलले जात आहे. हे बस स्थानक म्हणजे चोरट्यांचा अभ्यास बनला आहे. वास्तविक प्रवाशांनीही आपल्या किमती वस्तूंची काळजी घेण्याचे आवश्यकता असते. तरीही चोरीस गेलेल्या किमती वस्तूंचा तपास पोलिसांनी करावा अशी नागरिकांची अपेक्षा असते. विशेषतः गर्दीचे ठिकाणी सतर्क पोलिसांचे नेमणूक केली जावी, अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.
एकीकडे सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पोलिस अधीक्षक संदीप घुगे हे जिल्ह्यातील गुन्हे कमी होण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच, सांगली शहराचे नाक असलेल्या बस स्थानकातून होणाऱ्या वाढत्या चोऱ्यांमध्ये हे नाक ठेचण्याचेच प्रकार म्हटले पाहिजेत. त्यामुळे मुळात बस स्थानकातून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असलेल्या सांगली शहर पोलीस ठाण्याला समज द्यावी, अशीही नागरिकांतून मागणी आहे.