| सांगली समाचार वृत्त |
सोलापूर - दि. ९ डिसेंबर २०२४
महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला मिळालेल्या यशावरून सध्या ई एम व्ही मशीन वर शंका व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मार्कडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा पवित्रा घेतला. मात्र प्रशासनाने याला मंजुरी न देता तेथे या मतदान प्रक्रियेला बंदी घातली. यासाठी गावात जमावबंदी ही लागू केली. यावरून आता पुन्हा राजकारण रंगले आहे.
याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्टीकरण दिले असून, याबाबत त्यांनी म्हटले आहे की 29 तारखेला मरकडवाडी ग्रामस्थांनी निवेदन देऊन हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची विनंती केली. मात्र स्थानिक प्रशासनाला हा निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने हे निवेदन अमान्य करण्यात आले.
यावरून मारकवाडी येथे मतदान का करू दिलं नाही ? असा प्रश्न विचारला जात आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार कोणालाच मतदान घेण्याचे अधिकार नाहीत. जर ग्रामस्थांना निकालावर संशय असेल तर ते कोर्टात निवडणूक याचिका दाखल करू शकतात. पण स्वतः असे मतदान घेता येणार नाही. पोलीस नीट काम करत नाहीत म्हणून स्वतःचे तुरुंग किंवा फोर्स सुरू करता येत नाही त्याच स्वतः असं मतदान घेता येणार नाही असं जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी म्हटले आहे.
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आशीर्वाद म्हणाले की, राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी समोर एक ते 31 ऑगस्ट फर्स्ट लेव्हल चेकिंग करण्यात आले. हे चेकिंग करीत असताना प्रत्येक बॅलेट वर 96 मतदान करण्यात येतं प्रत्येक बटन सहा वेळा दाबण्यात येतात वेगवेगळ्या पद्धतीने ही चाचणी करण्यात येते या सर्वांचे व्हिडिओ पुरावे आपणाकडे उपलब्ध आहेत त्यानंतरच हे मशीन अकलूजला पाठवण्यात आले होते.
ज्या गाडीतून ईव्हीएम मशीन पाठवण्यात आले त्या गाडीला जीपीएस होते इतकच नव्हे तर ईव्हीएम मशीन येणाऱ्या गाड्यांनाही फॉलो करण्याची मुभा सर्वांना होते. नऊ तारखेला विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समोर हे मशीन अकलूज गोडाऊन मध्ये ठेवले तेव्हाच ईव्हीएम मशीन बेअरींग केले तेव्हाही राजकीय पक्षाचे उपस्थित होते. 11 तारखेला कमिशनिंग झालं तेव्हा उत्तम जानकर यांचे प्रतिनिधी तेथे उपस्थित होते वीस नोव्हेंबरला मतदान झालं. मारकडवाडी मध्ये तीन मतदान केंद्रे आहेत. 96 व 97 नंबर बुथ मध्ये प्रत्येकी चार पोलिंग एजंट उपस्थित होते तसेच 98 नंबर मध्ये तीन एजंट उपस्थित होते. यामध्ये ज्याने आक्षेप घेतले आहेत त्यांचे प्रतिनिधी ही मॉक पोल वेळी उपस्थित होते. यावेळी जे सर्टिफिकेट आम्ही घेतो तेव्हा पोलिंग एजंटची सही त्याच्यावर घेतली जाते. या सर्व एजंटने सर्टिफिकेट वर सही केली आहे. त्यामुळे आता मतदान प्रक्रियेवर शंका घेणे चुकीचे असल्याचे मतही जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले आहे.