yuva MAharashtra 'या' कारणावरून राजेश क्षीरसागर यांनी शाळांना दिला थेट अनुदान बंद करण्याचा इशारा !

'या' कारणावरून राजेश क्षीरसागर यांनी शाळांना दिला थेट अनुदान बंद करण्याचा इशारा !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ डिसेंबर २०२
केवळ दहावी बारावीतील बोर्डाच्या परीक्षेतच नव्हे तर अगदी शासकीय नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील कॉपीचे प्रकार सरस घडत असतात. शाळेचा परफॉर्मन्स वाढावा म्हणून काही शाळातून सामुदायिक कॉपीचे प्रकारही यापूर्वी उघडकीस आले आहेत.

याचा थेट परिणाम प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींबर होत असतो. कॉपी करून पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर आगामी बोर्डाच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार घडू नयेत म्हणून, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी थेट शाळांनाच इशारा दिला असून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी किंवा पेपर फुटली चे प्रकार आढळल्यास संबंधित शाळेचे अनुदान बंद करण्याचा इशारा दिला आहे.


येथील विलिंग्डन महाविद्यालयात जिल्ह्यातील प्राचार्य व मुख्याध्यापक यांची बैठक नुकतीच संपन्न झाली, यावेळी क्षीरसागर बोलत होते. यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी चांगली करून घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले की शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घेण्यात यावा. विद्यार्थ्यांचे उद्बोधन वर्ग घेऊन कॉफी मुक्तीची शपथ देण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली व केंद्रावरील गैरप्रकार बंद केले नाहीत तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा मुख्याध्यापक व प्राचार्यांना इशारा दिला आहे.

तब्बल सात वर्षांनंतर पूर्णवेळ विभागीय अध्यक्षांच्या उपस्थितीत थेट जिल्हास्तरावर बैठक झाली. मंडळ सातत्याने ऑनलाइन बैठका घेऊन परीक्षेच्या कामकाजाचा आढावा घेणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या मदतीने कडक नियंत्रणात परीक्षा घेणार असल्याचे सांगितले.

या बैठकीस विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, विभागीय सचिव सुभाष चौगुले, सहसचिव बी. एम. किल्लेदार, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, योजना शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, बोर्डाचे अधीक्षक सुधीर हावळ, एस. वाय. दुधगावकर, एम. जी. दिवेकर, एच. के. शिंदे, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

दरम्यान पालकांकडून राजेश क्षीरसागर यांच्या या भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे.