| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. २ डिसेंबर २०२४
लोकसंख्या शास्त्र सांगते की, लोकसंख्या वाढीचा दर २.१ पेक्षा कमी व्हायला नको. आता पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत, असे अत्यंत महत्त्वाचे विधान करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात कठाळे कुल संमेलनात बोलताना सरसंघचालकांनी हे विधान केले आहे.
लोकसंख्या शास्त्र सांगते की, लोकसंख्या वाढीचे दर २.१ पेक्षा खाली नको. या संमेलनात मोहन भागवत यांच्या आधी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींनी सध्या अनेक तरुण दांपत्य एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही, असा उल्लेख करत चिंता व्यक्त केली होती. त्याच मुद्द्याला पुढे घेऊन जात सरसंघचालकांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले. नक्कीच सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचे दर २.१ पेक्षा खाली गेले, तर तो समाज नष्ट होतो, तो समाज जगाच्या पाठीवर नसतो, त्याला कोणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहे, असे मोहन भागवत म्हणाले.
आपल्या देशाची लोकसंख्या नीती वर्ष २००० च्या जवळपास ठरली. त्याच्यातही असेच सांगितले आहे की, लोकसंख्या वाढीचा दर २.१ पेक्षा खाली राहू नये, असा उल्लेख करत भागवत म्हणाले की आता पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही. मग जर २.१ एवढे लोकसंख्या वाढीचे दर पाहिजे, तर अपत्य दोन पेक्षा जास्त पाहिजे. मग तीन पाहिजे कमीत कमी असंही भागवत म्हणाले.
हिंदूंच्या संख्येत ७.८ टक्क्यांनी घट
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने १९५० ते २०१५ या काळात भारतात हिंदू बहुसंख्य होते, असं स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे आता हिंदूंची लोकसंख्येत ७.८ टक्क्यांनी घट झाल्याचेही स्पष्ट केले आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये त्या देशातील प्रमुख धर्मियांची लोकसंख्या वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिवाय, यूपीएससीत मराठी यशवंतांचा टक्क घसरल्याचेही समोर आले आहे.
जैन, पारशींचीही लोकसंख्या घटली
अहवालानुसार, भारतात बौद्ध धर्मियांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, १९५० ते २०१५ या काळात मुस्लिमांची लोकसंख्या ४३.१५ टक्क्यांनी वाढ झाली, तर ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत ५.३८ टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल आहे. शिवाय शीख धर्मियांच्या संख्येतही ६.५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मुस्लीम लोकसंख्येचा टक्का वाढला
१९५० साली भारतातील हिंदूंच्या लोकसंख्येचा वाटा ८४ टक्के होता. तो २०१५ साली ७८ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. तर मुस्लीमांचा १९५० मध्ये असलेला वाटा ९.८४ टक्के होता, तो मात्र, १४.०९ टक्क्यांवरती पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीने जगभरातील १६७ देशांत १९५० ते २०१५ या कालावधीत लोकसंख्येत होत असलेल्या बदलांचा अभ्यास केला आहे.