yuva MAharashtra पेट्रोल मधील इथेनॉलचा वाढता वापर जुन्या गाड्यांच्या मुळावर, इंजिन जाम होण्याच्या धोक्यामुळे काळजी घेण्याची गरज !

पेट्रोल मधील इथेनॉलचा वाढता वापर जुन्या गाड्यांच्या मुळावर, इंजिन जाम होण्याच्या धोक्यामुळे काळजी घेण्याची गरज !

फोटो सौजन्य : Adobe stok

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ डिसेंबर २०२
सध्या पेट्रोल व डिझेलची विक्री करणाऱ्या सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी पेट्रोलमध्ये 20 टक्क्यापर्यंत इथेनॉलचा वापर करण्याचे धोरण अवलंबले आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम असला तरी, यामुळे जुन्या मॉडेलच्या वाहनांची इंजिने धोक्यात येण्याचा संभव जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पेट्रोलमध्ये पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तांत्रिक बाबीत सांगायचे म्हटले तर इथेनॉल ब्लेंडेड मोटर स्पिरिट नावाने हे पेट्रोल को ओळखले जाते पहिल्या टप्प्यात पूर्वी पेट्रोलमध्ये याचे प्रमाण 15% होते ते आता वीस टक्के झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिसळले जात असल्यामुळे पूर्वीच्या नारंगी असलेला पेट्रोलचा रंग सध्या कोकम सारखा दिसून येत आहे, परिणामी पेट्रोल पंपावर उपलब्ध होणाऱ्या पेट्रोलमध्ये भेसळ केली जात आहे का अशी पेट्रोल ग्राहकाकडून शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे अनेकदा पेट्रोल पंपावर ग्राहक व पंपचालक यांच्यामध्ये वादाचेही प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे तेल वितरण करणाऱ्या कंपन्यांनी याबाबतचा खुलासा करणारा माहिती फलक प्रत्येक पेट्रोल पंपावर लावावा अशी पंपचालकाकडून मागणी होत आहे.


सर्वच सरकारी तेल कंपन्यांनी महिन्याभरापासून ई-२० श्रेणीतील पेट्रोलचा पुरवठा सुरू केला आहे. यामध्ये इथेनॉलचे प्रमाण १५ टक्क्यांवरून २० टक्के केले आहे. त्याचा रंगही लाल आहे. ग्राहकांनी नवे पेट्रोल वापरताना गाडीच्या इंधन टाकीमध्ये पाणी जाऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. वाहनांच्या कार्यक्षमतेसाठी नवे पेट्रोल फायद्याचेच आहे. 

 

- सुरेश पाटील
जिल्हाध्यक्ष, पेट्रोल डीलर्स असोसिएशन, सांगली.

अन्य एका माहिती स्रोतानुसार इथेनॉलचे पेट्रोल मधील प्रमाण वाढल्यामुळे जुन्या वाहनांमध्ये पेट्रोलचा वापर करीत असताना वाहन मालकांनी काळजी घेण्याचे आवाहन पंप मालकांनी केले आहे. कारण या पेट्रोलमध्ये अल्पसे पाणी मिसळले तरी त्याचे जेली तयार होते व त्यामुळे वाहनांचे इंजन तात्काळ ब्लॉक होते. नव्या बीएस सहा श्रेणीतील दुचाकींना मात्र या पेट्रोलचा धोका नाही. जुन्या बनावटीच्या वाहनांच्या मालकांनी वाहनाच्या पेट्रोल टाकीमध्ये पाणी मिसळणार नाही याची काळजी घेण्याची.

सध्या सरकारी कंपनीच्या पेट्रोल पंपावर लाल रंगाचे पेट्रोल मिळत असले तरी खाजगी कंपनीच्या पेट्रोलचा रंग मात्र नारंगी असणार आहे. कारण खाजगी कंपनीच्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल आढळून येत नाही. सर्वच सरकारी तेल कंपन्यांनी महिन्याभरापासून ई-20 श्रेणीतील पेट्रोलचा पुरवठा सुरू केला आहे.