yuva MAharashtra राजगुरुनगर येथील चिमुरड्यांच्या हत्येतील आरोपीला फाशीच्या मागणीसाठी सांगलीत आक्रोश मोर्चा !

राजगुरुनगर येथील चिमुरड्यांच्या हत्येतील आरोपीला फाशीच्या मागणीसाठी सांगलीत आक्रोश मोर्चा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ डिसेंबर २०२
राजगुरुनगर येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बारमध्ये काम करणाऱ्या अजय दास (वय ५४, पश्चिम बंगाल) या वेटरने कार्तिकी सुनील मकवाने (वय ९) या चिमुकलीवर अत्याचार केला. यानंतर कार्तिकी व तिची लहान बहिण दुर्गा सुनील मकवाने (वय ८) यांची हत्या केली. या नराधमावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा व्हावी. या कामी ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चामध्ये सर्व धर्माच्या, पक्षाच्या, विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोसावी समाजातील नेते आकाश गोसावी यांनी पत्रकार बैठकीत केले.

याबाबत अधिक माहिती अशी की राजगुरुनगर येथील मकवाने कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते. अजय दास याचे या कुटुंबात नेहमीच ये-जा असे. तो नेहमी या छोट्या बहिणींना खाऊही देत असे. दोन दिवसांपूर्वी हे मकवाने दाम्पत्य अमोल मजुरीसाठी बाहेर गेले असताना, अजय दास (पश्चिम बंगाल) या परप्रांतीय नराधमाने कार्तिकी व दुर्वा यांना खाऊचे अमिष दाखवून बारमधील आपल्या खोलीवर नेले. येथे त्याने कार्तिकीवर अत्याचार केला. या प्रसंगाने घाबरून दोघी बहिणींनी आरडा ओरडा सुरू केला. तेव्हा अजय दास याने तेथे असलेल्या एका प्लॅस्टिक बॅरल मध्ये पाण्यामध्ये बुडवून या दोघी बहिणींची हत्या केली. व तो पसार झाला.
 
मकवाने कुटुंब घरी आल्यानंतर कार्तिकी व दुर्वा या मुली घरात न आढळल्याने, आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. परंतु या मुली आढळून आल्याने, पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हा आसपास चौकशी करून, सर्वच घरांची झडती घेतली. तेव्हा बार मधील दास याच्या खोलीतील बॅरल मध्ये या दुर्दैवी मुलींचे मृतदेह आढळले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा फरारी अजय दास हा पुण्यातील एका लॉजमध्ये असल्याची खबर मिळाल्याने तेथे त्याच्या मुस्क्या आवळल्या. 

या घटनेचा निषेध म्हणून आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी या मोर्चाचे आयोजन केल्याचे आकाश गोसावी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

राजगुरुनगर येथे रास्ता रोको व प्रशासनावर दबाव !