| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ डिसेंबर २०२४
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व विजय संपादन केल्यानंतर आझाद मैदानावर गाजत वाजत, मुख्यमंत्रीपदी हा दूर झालेल्या ना. देवेंद्रजी फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी अधिकार पदाची तसेच गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथविधीसाठी पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री उपस्थित राहिले होते. संपूर्ण महाराष्ट्राने हा महायुतीचा महाशपथविधी कार्यक्रम दूरदर्शन व विविध वृत्त वाहिन्यांवरून अनुभवला. भाजप प्रेमींनी सोशल मीडिया वरून या बातम्यांची लिंक मोठ्या प्रमाणावर व्हायरल केली होती. या शपथविधीची राज्यभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.
मात्र महाआघाडीच्या विरोधी पक्ष नेत्यांनी या शपथविधीकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर आता. मुंबईतील विधानभवनात महायुतीच्या आमदारांना, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे अधिकार पदाची शपथ देणार आहेत. मात्र महाआघाडीच्या आमदारांनी या शपथविधी कार्यक्रमासही ईव्हीएम ला विरोध म्हणून अनुपस्थिती दर्शवली. त्यानंतर विधानभवनाच्या पायरीवर हे नवनिर्वाचित आमदार जमा झाले आणि त्यांनी महायुती व निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेवर घोषणाबाजी करीत विरोध दर्शविला.
हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे प्रथम महायुतीच्या आमदारांना शपथ देणार असल्याने, महाआघाडी आमदारांच्या उपस्थिती व अनुपस्थिती बाबत काहीच फरक पडला नाही. महाआघाडीच्या आमदारांनी या शपथविधी कार्यक्रमास अनुपस्थिती दर्शवले असले तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोरील बाकावरच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव तर शरद पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील हे बसले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पाटील यांचे अभिनंदन केले.
दरम्यान महाआघाडीच्या आमदारांनी शपथ घेतली नाही तर नागपूर येथील आगामी विधानसभा हिवाळी अधिवेशनात या आमदारांना प्रवेश दिला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले आहे. अर्थात कायदेशीर रित्या महाआघाडीच्या आमदारांना शपथ घ्यावीच लागणार असल्याने ते नियमाप्रमाणे शपथ घेणार हे नक्की.
फोटो सौजन्य : गूगल स्रोत