yuva MAharashtra सांगली महापालिकेतील संत गाडगेबाबा अभिवादन !

सांगली महापालिकेतील संत गाडगेबाबा अभिवादन !


| सांगली समाचार वृत्त |
सागली - दि. २० डिसेंबर २०२
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत संत गाडगेबाबाना पुण्यतिथी दिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याहस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

यावेळी मनपा उपआयुक्त विजया यादव, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, सांगली परीट समाज सांगली जिल्हा अध्यक्ष स्मिता पवार, शहराध्यक्ष दत्तात्रय बन्ने, शहराध्यक्ष अनिता पवार, रेखा पवार, सीमा सरोळकर, शोभा पवार, गोपाल पवार, विलास गायकवाड, संजय पवार, सुनील सरोळकर, माधव साळुंखे, बन्सीलाल कदम, सागर देवरुखकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.