yuva MAharashtra मराठी पत्रकार परिषदेतर्फे सांगली जिल्ह्यातील पत्रकार व पत्रकारेतर कर्मचा-यांसह कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व नामवंत दवाखान्यात मोफत उपचार !

मराठी पत्रकार परिषदेतर्फे सांगली जिल्ह्यातील पत्रकार व पत्रकारेतर कर्मचा-यांसह कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व नामवंत दवाखान्यात मोफत उपचार !


| सांगली समाचार वृत्त |
सा॔गली - दि. २ डिसेंबर २०२
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने परिषदेचे मार्गदर्शक, मा. एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मराठी पत्रकार परिषदेतर्फे सांगली जिल्ह्यातील प्रिंट व डिजिटल मीडियातील सर्व पत्रकार, प्रेस फोटोग्राफर व पत्रकारेतर कर्मचा-यांसह कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, सांगली, मिरजेतील नामवंत दवाखान्यात मोफत उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी मंगळवार ३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ ते १२ दरम्यान आय एम ए हॉल, आमराई क्लब शेजारी, सांगली येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर तालुका पातळीवर शिबिराचे व नामवंत दवाखान्यातील उपचाराचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये रक्त व सर्व प्रकारची आरोग्य तपासणी होणार असून, ख्यातनाम दवाखान्यांमध्ये मोफत उपचार करण्यात येतील. ज्येष्ठांसाठी मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे इतर आजारावरही तपासणी व उपचार मोफत होणार आहेत. या शिबिरात महिला व मुलांची स्वतंत्र तपासणी करण्यात येईल.

या शिबिरातील तपासणीनंतर आवश्यक असणाऱ्या  सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातील नामवंत दवाखान्यात मोफत उपचारासाठी मराठी पत्रकार परिषद आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाची टीम सहकार्य करेल.


3 डिसेंबर रोजी सांगलीत आणि आठवड्याभरात संपूर्ण जिल्ह्यात तालुकावार आरोग्य शिबिरे होणार आहेत. ३ डिसेंबर २०२४ च्या शिबिराचा सांगली मिरज आणि आसपासच्या परिसरातील पत्रकार, पत्रकारांचे कुटुंबीय, वृत्तपत्र कर्मचारी आणि वृत्तपत्र विक्रेते यांनी सहकुटुंब येऊन या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष श्री. शिवराज काटकर यांनी केले आहे.