| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ डिसेंबर २०२४
आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनपा कर्मचारी, अधिकारी यांना तणावमुक्त आणि आनंदी मनाने दैनंदिन कामकाज करणे सोयीचे होण्यासाठी जागतिक ध्यान दिवस या सकल्पातून ध्यान दिवस मनपा मध्ये साजरा करण्याची कल्पना राबविली आहे ,
प्रथम अति आयुक्त निलेश देशमुख यांच्या हस्ते धन्वंतरीदेवीची प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करण्यात आली. त्यानंतर आर्ट ऑफ लिविंग गव्हर्मेंट प्रोग्रॅम जिल्हा समनव्य व प्रशिक्षक सौ. संगीता पाटील यांच्या हस्ते ध्यानाबद्दल माहिती दिली. आर्ट ऑफ लिविंग यांच्या वतीने ध्यान या विषयी सर्वांना अडिओ मध्यमातून ध्यान बाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यावेळी अति. आयुक्त निलेश देशमुख उपआयुक्त विजया यादव,आरोग्यधिकारी डॉ. वैभव पाटील, नगरसचिव सहदेव कावडे, जन संपर्क अधिकारी धनंजय हर्षद, सहा. आयुक्त नकुल जकाते, आर्ट ऑफ लिविंगचे स्वयंसेवक शिवाजी सावंत, पौर्णिमा पाटील, मनपा कर्मचारी, अधिकारी वर्ग या वेळी उपस्थित होते.