पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. अभिनेत्री उर्मिला काल (२७ डिसेंबर) रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. त्याचवेळी गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्याला कडेला मेट्रोचे काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले.
यावेळी एका मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा मजूर जखमी झाला. अपघातात कारचालकासह अभिनेत्री उर्मिला कोठारे या देखील जखमी झाली आहेत. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.