yuva MAharashtra पत्रकार बैठकीत अजित पवारांच्या फुलटॉसवर एकनाथ शिंदे यांचा सिक्सर, अन् झाला हास्यकल्लोळ!

पत्रकार बैठकीत अजित पवारांच्या फुलटॉसवर एकनाथ शिंदे यांचा सिक्सर, अन् झाला हास्यकल्लोळ!


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ डिसेंबर २०२
महायुती सरकारच्या गत कार्यकाळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील शीतयुद्ध सर्व राज्याला परिचित आहे. त्यामुळे 'महायुती-२' सरकारमध्ये या दोन नेत्यांमध्ये कलगी तुरा रंगणार का ? असा प्रश्न काल राज्यपालांना नव्या सरकार स्थापनेबाबतचे पत्र देऊन आल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, अजित पवार यांनी टाकलेल्या फुलटॉसवर एकनाथ शिंदे यांनी सिक्सर लगावला. आणि हास्य कल्लोळात पत्रकार बैठक संपन्न झाली. पण यादरम्यान या दोन नेत्यांची झालेली जुगलबंदी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली आहे.

राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी सत्तास्थापनेसाठी आपली भूमिका मांडल्यानंतर पत्रकार प्रश्न विचारत होते.


यावेळी एका पत्रकारानं शिंदेंना प्रश्न विचारला की तुम्ही आणि अजित पवार उद्या शपथ घेणार आहेत का? यावेळ शिंदे उत्तर देताना म्हणाले, आम्ही आत्ताच तर सांगितलं, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आणि मी देखील सांगतोय थोडावेळ थांबा जरा. आता संध्याकाळपर्यंत वाट तर पाहा, उद्या शपथविधी आहे ना?

यावर शिंदेंचं वाक्य मध्येच तोडत त्यांच्या बाजुला बसलेले अजित पवार म्हणाले, "संध्याकाळपर्यंत त्यांचं कळेल, पण मी तर घेणार आहे, मै रुकने वाला नहीं" ज्या अजित पवार हे वाक्य बोलले अन् अजित पवारांच्या या फुलटॉसवर एकनाथ शिंदे यांनी सिक्सरच लगावला. शिंदे म्हणाले, दादांना अनुभव आहे संध्याकाळीपण शपथ घ्यायची आणि एकदम सकाळी देखील घ्यायची. शिंदेंच्या या विधानानंतर हास्यकल्लोळ झाला.