yuva MAharashtra पंढरीतील संत नामदेव स्मारक व जन्मस्थळ जिर्णोध्दारासाठी पाठपुरावा करण्याचा, अ.भा. नामदेव क्षत्रिय महासंघाच्या बैठकीत ठराव !

पंढरीतील संत नामदेव स्मारक व जन्मस्थळ जिर्णोध्दारासाठी पाठपुरावा करण्याचा, अ.भा. नामदेव क्षत्रिय महासंघाच्या बैठकीत ठराव !


| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. २९ डिसेंबर २०२
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे शासनाने मंजूर केलेल्या १५ कोटींच्या संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारकांचे काम लवकर सुरु करण्यात यावे. २०२५ मध्ये संत नामदेव महाराजांचा ६७५ वा संजिवन समाधी सोहळा पंढरपूर येथे भव्य-दिव्य स्वरुपात साजरा करणे तसेच श्री केशवराज संस्थेच्या संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या प्रदक्षिणा रोडवरील संत नामदेव मंदिराचा जिर्णोध्दार करणे यासह अनेक ठराव अ.भा. नामदेव क्षत्रिय महासंघाच्या राज्यस्तरीय बैठकीत एकमुखाने मंजूर करण्यात आले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष ॲड. महेश ढवळे यांनी दिली. येथील संत नामदेव मंदिर येथे शुक्रवार दि. २७ रोजी अ.भा. नामदेव क्षत्रिय महासंघाची बैठक प्रदेशाध्यक्ष ॲड. महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी श्री केशवराज व नामदेव महाराजांचे पूजन करण्यात आले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, समाजाचे म्हेत्रे, अनंता पतंगे यांच्यासह मयत समाज बांधव, मान्यवरांना श्रध्दांजली वाहण्यात आली. बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून सर्व ठराव एकमुखाने हात वर करून मंजूर करण्यात आले. 


शिपी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासनाने संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. यासाठी ॲड. महेश ढवळे यांनी घेतलेल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी श्री केशवराज संस्था व समस्त शिंपी समाज पंढरपूर यांच्यावतीने उपस्थित पदाधिकार्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष ॲड. महेश ढवळे म्हणाले, संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ हे राज्य शासनाने शिंपी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी मंजूर केले आहे. यासाठी काय करावे लागते याबाचत मार्गदर्शन करून सदर योजनेच्चा शिंपी समाजातील विविध पोटजातीमधील गरजू लोकांनी लाभ घेण्याचे तसेच शिंपी समाजातील सर्व पोटजातीमधील नागरिकांनी समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ योजना तसेच संत नामदेव महाराज स्मारकाची उभारणी, संत नामदेव मंदिराचा जीणर्णोध्दार करण्यासाठी तसेच सर्वागिण प्रसगतीसाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व राज्यशासनाने १५ कोटी रुपये मंजूर केलेल्या संत नामदेव महाराजांचे स्मारक व संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करणे या विषयावर सविस्तर चर्चा होऊन हा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतला. लवकरच भारतातील सर्वात मोठे संत नामदेव महाराजांचे स्मारक व संत नामदेव महाराजांचे मंदिर उभारण्याचा संकल्प याप्रसंगी करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष ॲड. महेश ढवळे, केशवराव संस्थेचे सर्वेसर्वा रूपेश खांडके, नामदेव समाजोव्रती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर व पंढरपूर शिंपी समाजाच्या पदाधिकार्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात या महत्त्वपूर्ण विषयाला सर्वानुमते मंजुरी दिली. संत नामदेव महाराज मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने देणगी देण्याचे जाहिर केले. 

पुढील वर्षी जुलै महिन्यात संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन भव्यदिव्य प्रमाणात करण्याचे ठरविण्यात आले. ॲड. महेश ढबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रात समस्त शिंपी समाज एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब पाथरकर, संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास, केशवराज संस्थेचे सचिव धनंजय जवंजाळ, नासपचे अध्यक्ष संजय नेवासकर, पंढरपूर शिंपीसमाज अध्यक्ष गणेश उंडाळे, जिल्हाध्यक्ष राजेश धोकटे, केशवराज संस्थेचे विश्वस्त औदुंबर निकते, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भावलेकर गुरुजी, प्रदेश पदाधिकारी महादेव खटावकर, ड अजय तल्लार प्रज्ञा तल्लार मुंबई प्रदेश अध्यक्ष अशोक खैरनार, संतोष मुळे मनोज भांडारकर, नंदकुमार कोसतवार, अनिल गचके, प्रभाकर नानोटे, महेश मुरलीधर रेळेकर, अरुण होमकर, संतोश माणकुसकर, विलास पोरे, महेश गानबोटे, जयवंत कांचळे, संजय चांडोले, दत्तप्रसाद निपाणकर, छायाचित्रकार किशोर काकडे, प्रशांत काकडे, पत्रकार प्रशांत माळवदे, भिकाजीराव गनबावले, प्रदेश महिला अध्यक्षा रेखाताई मुळतकर, युवक अध्यक्ष अँड. सिद्धार्थ भांबुरे, अकलूजचे विजय देवळे, दिनकर चांडोले, युवक संघटनेचे अध्यक्ष शैलेश घट, दत्तात्रय चांडोले, रत्नाकर पिसे यासह महाराष्ट्रातील एकूण २७ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी, पुरुष, युवक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.