yuva MAharashtra महापालिका अंदाजपत्रकात विकासाबाबत नवं संकल्पना सुचविण्या बाबत शुभम गुप्ता आयुक्त यांचे आवाहन !

महापालिका अंदाजपत्रकात विकासाबाबत नवं संकल्पना सुचविण्या बाबत शुभम गुप्ता आयुक्त यांचे आवाहन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ डिसेंबर २०२
नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व संस्था, एन. जी. ओ., यांनी अंदाजपत्रकासाठी आपल्या सूचना, संकल्पना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सांगली मिरज व कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, यांनी केले आहे.

 मनपा प्रशासन बजेट तयार करत असते म, पण यावेळी येणाऱ्या वर्षासाठी नागरिकांनी सुचलेल्या आणि व्यवहारपूर्ण स्वरूपाच्या, अंमलबजावणी करता येईल अशा संकल्पना विचारात घेण्याचे धोरण आयुक्त शुभम गुप्ता यांनी ठरविले आहे.

यामध्ये फुले आणि मुले यांनी भरलेली उद्याने, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू वापर, दैनंदिन परिसर स्वच्छता मोहीम, सिंगल युज प्लास्टिक मुक्त महापालिका क्षेत्र, कापडी बॅग वापर, सोलर युज सिटी, घरापासून कचरा विलगीकरन प्रक्रिया सोपी करणेसाठी नवं कल्पना, ऑन कॉल कचरा उठाव मोहीम यशस्वी राबविण्यासाठी कल्पना, नदी स्वच्छता, भटक्या जनावरांचे निवारा केंद्र तयार करणे, वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेणे, ई बाईक व सायकल वापर सामाजिक ग्रुप तयार करणे, सामुदायिकरित्या एक दिवस डास निर्मूलन मसाठी ड्राय डे साजरा करणे, पाणीपट्टी ,घरपट्टी ऑनलाइन सुविधा व्यापक करणे, बांधकाम परवाने सुविधा ऑनलाइन सुविधा गतिमान करणे इत्यादी... अशा एक नाही अनेक नवे कल्पना सुचविणे आणि प्रशासना बरोबर नागरिकांनी या वेळी अंदाजपत्रक प्रक्रिया नागरिकांच्या प्रश्नाबाबत जोडणे यासाठी सूचना आणि संकल्पना मांडण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे. असे धोरण निश्चित करण्यात येत आहे.


आयुक्त शुभम गुप्ता यांनी बजेट प्रक्रिया ही वास्तव स्वरूपात नागरिकांच्या प्रश्नावर उपाय करणारी निर्माण व्हावी या उद्देशाने ही संकल्पना मांडली आहे. सोयी सुविधा उपलब्ध करून देत असताना नागरिकांचा सहभाग देखील महत्वाचा असणे आवश्यक आहे या उद्देशाने हे एक पाऊल उचलले आहे.

तिन्ही शहरातील भोगोलिक रचना आणि लोक वस्ती विचारात घेऊन विकासाचे धोरण निश्चित करताना कोणताही ताळमेळ बिघडू नये यासाठी सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. नागरिकांचे मत हे अनमोल असणार आहे तेव्हा आपल्या संकल्पना थोडक्यात नमूद करून मनपा उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे असे आवाहन शुभम गुप्ता आयुक्त यांनी केले आहे.