| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ डिसेंबर २०२४
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचे उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने हालचाली सुरू केले आहेत. परिणामी जर अलमट्टी धरणाची पाणी पातळी 524.256 पर्यंत गेल्यास त्याचा धोका कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना बसणार आहे. ही फूग कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीतून इचलकरंजीपर्यंत, तर सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ बंधाऱ्या मागे कृष्णा नदीतून भिलवडी पर्यंत जाण्याचा धोका आहे.
दुर्दैवाने महाराष्ट्र शासन याबाबत गंभीर नाही. आणि म्हणूनच नदी काठावरील गावागावांमध्ये जनजागृती करून आंदोलन उभे करण्याचा निर्णय कृष्णा पंचगंगा महापौर नियंत्रण कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आली.
यावेळी सर्जेराव पाटील म्हणाले की, 2005 पूर्वी कृष्णा नदीचा महापौर एक ते दोन दिवस राहत होता. पण अलमट्टी धरणाची उंची वाढवली. धरणात 519.60 मीटर पाणी पातळी गेल्यानंतर अलमट्टीच्या वरील बाजूस असलेल्या ही पोरगी धरणातील तळपातळी 518 मीटर, तर राजापूर बंधाऱ्यातील तळपातळी 518.30 मीटर, त्यामागे पंचगंगा नदीत नृसिंहवाडी पर्यंत व एक म्हैसाळ बंधा-यापर्यंत पाण्याची फुग येते. पाठीमागून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांचा येणाऱ्या प्रवाहामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. विशेषतः पावसाळ्यात महापुरामुळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण होतो.
वास्तविक महाराष्ट्र शासनाने याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अलमट्टी धरणाची उंची कायम रहावी यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयीन लढा उभारण्याची आवश्यकता आहे. जर महाराष्ट्र शासन याबाबत काही पावले उचलणार नसेल, तर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची आवश्यकता आहे, असेही सर्जेराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
या बैठकीस प्रभाकर केंगार, सुहास पाटील, संजय कोरे, सुयोग हावळ, अभिषेक दिवाण, सतीश रांजणे, ओंकार दिवाण, आनंदराव कोरे, संजय येडेकर, दिलीप शिंदे, अनंतराव अडित्रे इ. मान्यवर उपस्थित होते.