| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ डिसेंबर २०२४
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी शास्त्री चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापूरे तसेच जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष स्नेहल सावंत माजी सभापती बिरेंद्र थोरात यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं.
त्यानंतर महापालिका मुख्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उप आयुक्त वैभव साबळे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण,
सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, नगरसचिव सहदेव कावडे, वित्त अधिकारी धनजय जाधव , प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे , नगर अभियंता परमेश्वर अलकुडे, अग्निशमन अधिकारी सुनील माळी ,यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.