| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३१ डिसेंबर २०२४
गेल्या महिन्यात जत तालुक्यातील एका उद्योगपतीचा बंगळुरू जवळ झालेला अपघात असो किंवा वाशी येथील हर्ष मावजी आरोठीया या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा झालेला दुर्देवी मृत्यू... या दोन्ही अपघातातील कार्स लाखो रुपयांच्या होत्या. यामध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा कार्यान्वितही होत्या. परंतु तरीही बंगळुरू जवळील असो किंवा वाशीतील अपघात. यामुळे केवळ सुरक्षित कार गाडीतील प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यास कारणीभूत आहेत का ?... असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
सध्या कार्सच्या सुरक्षेततेबाबत बोलायचे झाले तर, खालील काही फीचर्स तुमच्या कारला अधिक सुरक्षित बनवू शकतात:
एअरबॅग्स
अपघाताच्या वेळी प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी एअरबॅग्स महत्त्वाची भूमिका बजावतात.ॲन्टी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS)
ब्रेक लावल्यावर चाकं लॉक होण्यापासून रोखून वाहनाचा नियंत्रण राखण्यास मदत करते.
ॲन्टी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS)
ब्रेक लावल्यावर चाकं लॉक होण्यापासून रोखून वाहनाचा नियंत्रण राखण्यास मदत करते.इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP)
वाहनाच्या स्थिरतेसाठी आणि स्किडिंग टाळण्यासाठी उपयुक्त.
इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP)
वाहनाच्या स्थिरतेसाठी आणि स्किडिंग टाळण्यासाठी उपयुक्त.रिव्हर्स पार्किंग कॅमेरा
पार्किंगच्या वेळी मागील दृश्य दाखवून अपघातांची शक्यता कमी करतो.
रिव्हर्स पार्किंग कॅमेरा
पार्किंगच्या वेळी मागील दृश्य दाखवून अपघातांची शक्यता कमी करतो.टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS)
टायरच्या हवेच्या दाबावर लक्ष ठेवून, कमी दाब असल्यास सूचना देते, ज्यामुळे अपघातांची शक्यता कमी होते.
टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS)
टायरच्या हवेच्या दाबावर लक्ष ठेवून, कमी दाब असल्यास सूचना देते, ज्यामुळे अपघातांची शक्यता कमी होते.या फीचर्समुळे वाहन चालवताना सुरक्षितता वाढू शकते.
बंगळुरू जवळील कार अपघात हा, ना कार चालकाच्या चुकीने झाला, किंवा कार्स मधील सुरक्षित यंत्रणा बंद पडल्यामुळे. समोरील येणारा एक कंटेनर कारवर कोसळला आणि एकाच कुटुंबातील सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. असाच प्रकार वाशी मधील दुर्दैवी हर्ष च्या बाबतीत घडला मात्र तो वेगळा प्रकाराने.
अनेकवेळा एयर बॅग न उघडल्यामुळे प्रवाशांचे मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत, पण नवी मुंबईतील एका अपघातामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. अपघातादरम्यान गाडीतील एयर बॅग ही प्रवाशांसाठी वरदान ठरते, असं म्हटलं जातं, मात्र हीच एयर बॅग वाशीतील 6 वर्षांच्या हर्ष आरोठीया या कोवळ्या मुलाच्या जीवावर बेतली आहे.
हर्ष आपल्या वडिलांसोबत रात्रीच्या जेवणानंतर 11 वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारायला बाहेर निघाला. हर्षचे वडील गाडी चालवत होते, त्यांच्या बाजूच्या सिटवर हर्ष बसला होता, त्याचवेळी गाडी अचानक पुढच्या डिव्हायडरला आदळली आणि विचित्र अपघात झाला. गाडी डिव्हायडरला जाऊन आदळल्यामुळे गाडीच्या एयर बॅग उघडल्या. या एयर बॅगचा जोर जास्त असल्यामुळे हर्षच्या गळ्याला जबर मार लागला आणि यात हर्षचा गुदमरून मृत्यू झाला.
या दोन्ही घटनेतील प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. दोन्ही कार सुस्थितीतील होत्या. दोन्ही कार्सच्या चालकांचा तसा काहीही दोष नव्हता तरीही या कार्समधील प्रवाशांना आपली प्राण गमवावे लागले. परिणामी केवळ कार्स महागड्या किंवा अत्याधुनिक सोयी सुविधा असून उपयोगाच्या नाहीत, वास्तविक अनेक अपघात हे जरी कार चालकांच्या चुकीमुळे घडत असले, तरी प्रत्येक वेळी कार चालकच स्वतः दोषी असेल असे नाही. अनेकदा स्वतःची काही चूक नसतानाही कार चालकाला व तो चालवत असलेल्या कार्स मधील प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर सुरक्षित ड्रायव्हिंग आणि चालकाची चोहो बाजूला घारी सारखी नजर आवश्यक असल्याची शिकवणूक या अपघातातून मिळते.