yuva MAharashtra देशात राष्ट्रीय दुखवटा..! राम शिंदेंनी मर्यादा ओलांडली, गुलाल उधळून, नाच गाण्यातून साजरा केला आनंद !

देशात राष्ट्रीय दुखवटा..! राम शिंदेंनी मर्यादा ओलांडली, गुलाल उधळून, नाच गाण्यातून साजरा केला आनंद !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३१ डिसेंबर २०२
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर संपुर्ण देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुखात सहभागी होऊन सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र महाराष्ट्रात विधान परिषदेवर सभापती निवड झाल्यानंतर भाजपचे प्रा. राम शिंदे यांचं राष्ट्रीय दुखवटा असूनही आपल्या मतदारसंघात गुलाल उधळत भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावरून आता विरोधकांनी टिका करण्यास सुरूवात केली आहे.

सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊन सराकर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करत असते. यावेळी भारताच्या ध्वज संहितेनुसार, राष्ट्रीय दुखवट्यावेळी, भारतासह परदेशातील संस्थांमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. तर या काळात औपचारिक आणि अधिकृत काम केले जात नाही. मेळावे आणि अधिकृत सरकारी मनोरंजनपर कार्यक्रमावरही बंदी असते. परंतु या सर्व मर्यादा काल 'राम शिंदे' यांनी काल ओलंडल्या आहेत.


विधान परिषदेवर सभापती म्हणून निवड झाल्यानंतर राम शिंदे यांचा काल सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत, नाच गाणं करत भव्य असा सत्कार समारंभ पार पडला. याची एक पोस्ट देखील राम शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. संपुर्ण देशात राष्ट्रीय दुखवटा असतांनाही राम शिंदे आनंदात नाचत असल्याने त्यांच्यावर आता संताप व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून रोष व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या एक्सवर असं म्हटलं आहे की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह साहेब यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असतानाही प्रा. राम शिंदे साहेब यांची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल भाजपने कर्जत-जामखेडमध्ये त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली. कदाचित उत्साही कार्यकर्त्यांनी हे केलं असावं, पण हे कोणत्याही घटनात्मक पदाला साजेसं नसल्याने दिवंगत पंतप्रधानांच्या सन्मानार्थ आणि सभापती पदाची गरिमा राखण्यासाठी हे टाळता आलं असतं तर बरं झालं असतं.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह साहेब यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असतानाही प्रा. राम शिंदे साहेब यांची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल भाजपने कर्जत-जामखेडमध्ये त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली. याबद्दल आता विरोधक राम शिंदे यांच्यावर टीका करीत आहेत.