| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ डिसेंबर २०२४
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज मबाबा पाटील यांच्याबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियातून वायरल केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सतीश साखरकर यांच्यासह आठ जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या मतदानावर विपरीत परिणाम होऊन त्यांना कमी मते मिळावीत, असा आहे तो ठेवून तथ्यहीन काल्पनिक मजकूर असलेल्या पोस्ट व्हायरल करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला होता, अशी फिर्याद महावीर पाटील यांनी दिली होती. त्यांच्या फिर्यादीची दखल घेऊन संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सतीश साखळकर व अन्य कार्यकर्ता विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालेले यांनी, सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.