yuva MAharashtra जेष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर विभागीय सचिवपदी निवड !

जेष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर विभागीय सचिवपदी निवड !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ डिसेंबर २०२
सांगलीतील जेष्ठ पत्रकार आणि पुण्यनगरीचे माजी आवृत्ती प्रमुख श्री. चंद्रकांत क्षीरसागर यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर विभागीय सचिव पदी निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातील इतर विभागातील सचिवांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

श्री. सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी परिषदेच्या प्रगती आणि प्रसार कार्याची जबाबदारी मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि कार्यकारिणीने क्षीरसागर यांचे 40 वर्षापासूनचे परिषदेसाठी केलेले पत्रकार संघटन कार्य लक्षात घेऊन सोपवली आहे. श्री. चंद्रकांत क्षीरसागर हे पत्रकारांच्या उन्नतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात. शासनाच्या ॲक्रिडेशन कार्ड च्या बाबतीत असो, ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन असो, किंवा मग शासकीय कार्यालयातील इतर कोणतेही काम. श्री. क्षीरसागर हे करीत असतात. केवळ पत्रकारांचेच नव्हे तर इतर सर्वसामान्य नागरिकांचेही शासकीय कार्यालयातील काम ते विना मोबदला करीत असतात.

मराठी पत्रकार परिषदेच्या कोअर कमिटीच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्तयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.. विभागीय सचिवांच्या नियुक्तया करताना तरूणांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.. एस.एम.देशमुख बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

बैठकीस विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, मावळते विभागीय सचिव गणेश मोकाशी उपस्थित होते.. प्रारंभी पिंपरी चिंचवड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले आणि टीमने परिषदेच्या पदाधिकारयांचे स्वागत केले.

मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनात्मक रचनेत विभागीय सचिवांना विशेष महत्व आहे.. आपल्या विभागात संघटनेचं काम वाढविणयाबरोबरच विभागातील जिल्हे, तालुका पत्रकार संघांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्याचं काम ही व्यवस्था करते..परिषदेच्या उपक्रमांची आपल्या विभागात अंमलबजावणी करण्याचं काम विभागीय सचिव पार पाडतात.. थोडक्यात विभागीय सचिव हे परिषदेचे कान व डोळे म्हणून कार्यरत असतात.

नवे विभागीय सचिव पुढील प्रमाणे...

1) मुंबई विभाग : दीपक कैतके, मुंबई फेरनियुक्ती 
2) मपुणे विभाग : पी . पी. कुळकर्णी, सोलापूर 
3) संभाजीनगर विभाग : रवी उबाळे, बीड
4) नागपूर विभाग : प्रदीप घुमटवार, नागपूर 
5) अमरावती विभाग : शिखरचंद हुकूमचंद बागरेचा, वाशिम 
6) कोकण विभाग : मनोज खांबे, महाड
7) लातूर विभाग : सचिन शिवशेट्टे उदगीर, फेरनियुक्ती 
8) नाशिक विभाग : अमोल खरे, मनमाड 
9) कोल्हापूर विभाग :चंद्रकांत क्षीरसागर, सांगली.. 
एस.एम.देशमुख यांनी सर्व नवनियुक्त विभागीय सचिवांचे अभिनंदन केलं आहे..