| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ डिसेंबर २०२४
नुकतीच पार पडलेली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक चांगलीच गाजली. या विधानसभेत महायुतीला संपूर्ण बहुमत प्राप्त झाले असून, विरोधकांनी मिळालेल्या या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले, तरी तरीही केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर शिक्का मुहूर्त केले. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आरोपाचा फज्जा उडाला.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची हॅट्रिक केली. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असतानाच, इकडे सांगलीतील भाजपचे उमेदवार सुधीर दादा गाडगीळ यांनीही हॅट्रिक केली.गेले दोन टर्म सुधीर दादांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर हा विजय तिहेरी लढतीत मोठ्या संख्येने मिळवल्याने, भाजप व सुधीर दादा प्रेमींमध्ये आनंदाचे भरते आले आहे.आज सुधीर दादांनी तिसऱ्यांदा आमदारकीची शपथ घेतली. विशेष म्हणजे सुधीर दादांनी ही शपथ संस्कृत मधून घेतली... याचा बाबतीतला हा व्हिडिओ आमच्या वाचकांसाठी...
ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा !
व्हिडिओ सौजन्य : विधानसभा टीव्ही...
उपलब्धता : मोहन राजमाने, सांगली.