yuva MAharashtra भारतीय जनता पार्टी सांगली (ग्रामीण) जिल्ह्याची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न !

भारतीय जनता पार्टी सांगली (ग्रामीण) जिल्ह्याची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ डिसेंबर २०२
भारतीय जनता पक्ष सांगली ग्रामीण जिल्ह्याची बैठक, जिल्हाध्यक्ष दीपक (बाबा) शिंदे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबरोबर सांगली जिल्हयामध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. आठ विधानसभा पैकी भाजपच्या वाट्याला पाच विधानसभा जागा आल्या होत्या. त्यापैकी चार विधानसभे मध्ये विजय संपादन करून भारतीय जनता पक्ष विजयी झाला आहे. 

याबद्दल सर्व विजयी आमदार, जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते यांच्या अभिनदंनाचा ठराव या बैठकीत पारीत करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आगामी भाजपा सभासद नोंदणी कार्यक्रमाबद्दल तसेच भाजपाची ध्येयधोरणे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 


जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग यांनी नवीन सभासद होण्यासाठी सभासद नोंदणी
करण्याविषयी तांत्रिक माहिती दिली. यावेळी रविकांत साळुंखे मल्लेवाडी, यांची सचिव पदी व दिलीप कुमार पाटील, म्हैसाळ यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सरचिटणीस मिलींद कोरे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. या वेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, अनिल पाटील, आझम मकानदार, प्रकाश गढळे, के. डी. पाटील, जयराज पाटील, प्रभाकर जाधव व सुनील पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.