yuva MAharashtra काँग्रेस कमिटीत स्व मदन भाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त सेवा दलातर्फे अभिवादन !

काँग्रेस कमिटीत स्व मदन भाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त सेवा दलातर्फे अभिवादन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ डिसेंबर २०२
सांगली जिल्ह्याचे खासदार, मंत्री व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आदरणीय मदन भाऊ पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज त्यांच्या स्मृती स्थळावर जाऊन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस कमिटीत सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष मा.अजित ढोले व राज्य प्रवक्ते मा. संतोष पाटील यांच्या हस्ते फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आले. 

या वेळेला जिल्हाध्यक्ष मा.अजित ढोले म्हणाले की, आज स्वर्गीय मदन भाऊंची जिल्ह्याला गरज होती मदन भाऊ गेल्यापासून सांगलीत दुफळी निर्माण झाली आहे. भविष्यकाळात काँग्रेस पक्षातील वाद मिटवून सर्वांनी मिळून काम करूया, हीच खरी श्रद्धांजली ठरेल, स्वर्गीय मदन भाऊंनी सांगली जिल्ह्याला एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला, व अनेक उद्योग निर्माण करून तरुणांच्या हाताला काम दिले. त्यामुळे त्यांची कमतरता जाणवते अशा भावना व्यक्त केल्या. 


या वेळेला राज्य प्रवक्ते मा.संतोष पाटील म्हणाले की, सांगली शहरातील व जिल्ह्यातील तरुणांना एक आशेचा किरण असणारे त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा कायम प्रयत्न करणारे व तरुणांना 'मै हू ना' असे सांगितले की सगळे विषय चुटकी सुटायचे अशी भाऊंची खासियत होती त्यामुळे युवकांना दिलासा मिळत होता व त्यांची कामे होत होती. सध्याच्या झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संबंध राज्यभर मराठा समाज, मुस्लिम समाज, दलित समाज व इतर बहुजन समाजाने महाविकास आघाडीला साथ दिली होती व या सर्वांनी महाविकास आघाडीलाच मतदान केले होते. परंतु महाविकास आघाडी सत्तेवर येणार हे महायुतीच्या दिल्लीतील आणि राज्यातील काही प्रमुख नेत्यांनी ओळखले होते. त्यामुळे आपण आता ह्या परीक्षेत पास होऊ शकणार नाही यामध्ये दुसऱ्याचा पेपर बघून किंवा कॉपी करूनच आपण पास होऊ असं त्यांना ठाम विश्वास होता. म्हणून त्यांनी गुजरात मधूनच खाजगी कंपनीच्या ईव्हीएम मशीन आणून त्यामध्ये गडबड करून महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी केली. त्यामुळे ईव्हीएम मशीननेच महायुतीला एवढ्या जागा मिळवून दिल्या. पूर्ण राज्याचा निकाल बदलून त्या ठिकाणी महाविकास आघाडी ऐवजी महायुतीचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील नेत्यांने एकमेकांवर आरोप न करता, याचा दोष केवळ आणि केवळ ईव्हीएम मशीनचा आहे त्यामुळे भविष्यकाळात काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्ष मजबूत करावी. सांगलीतील विधानसभेचा पराभव पक्षाचा, नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा नसून हा पराभव ईव्हीएमचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेत्यांने इतर कुठल्या पक्षात न जाता काँग्रेस पक्ष मजबूत करावा, असे वक्तव्य राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी स्वर्गीय आदरणीय मदन भाऊ यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करताना सांगितले. 

या वेळी ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार म्हणाले की, आज स्व.मदन भाऊंची मनोमनी आठवण येते व त्यांची कामाची दखल प्रदेश काँग्रेस कमिटीला घ्यावी लागत होती. जिल्ह्यातील सर्व नेत्यानी काँग्रेस पक्ष बळकट करावा अशी सांगितले. 

संघटक मा.पैगंबर शेख म्हणाले की, या राज्याला या जिल्ह्याने दिशा दिली आहे परंतु हा जिल्हा सध्या अंतर्गत वादामुळे थोडासा मागे पडत आहेत त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन आजच्या स्वर्गीय मदन भाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी एकत्र राहावे व भविष्यकाळात परत एकदा काँग्रेस पक्ष बळकट करावा असे सांगितले. या वेळेला युनुस जमादार,एम के कोळेकर,अरुण पळसुले, प्रा. दादासाहेब ढेरे, मौला वंटमोरे, खुदबुद्दीन मुजावर, विठ्ठल काळे, गणेश वाघमारे, अशोक सावंत, विक्रमसिंह पाटील,अनेक पदाधिकारी उपस्थित होते व शेवटी लालसाब तांबोळी यांनी आभार मानले.