yuva MAharashtra तासगावातील सराफाचे कोल्हापूरमध्ये जप्त केलेले दोन कोटी रुपये आयकर विभागाकडे सुपूर्त, चौकशी सुरू !

तासगावातील सराफाचे कोल्हापूरमध्ये जप्त केलेले दोन कोटी रुपये आयकर विभागाकडे सुपूर्त, चौकशी सुरू !


          फोटो सौजन्य : shetterstok 

| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. ३१ डिसेंबर २०२
निवडणूक काळात नाकाबंदीच्या वेळी करोडो रुपयांची रक्कम पोलिस जप्त करीत असतात. त्याची बातमीही होते. परंतु खरी प्रसिद्धी मिळते ती तर वेळी सापडलेल्या बेशोबी घबाडाची...

काही दिवसापूर्वी नागाळा पार्क येथे घडला. येथून शाहूपुरी पोलिसांनी रात्री गस्तीच्या दरम्यान एका कारमधून जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. या रकमेची कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. अखेर ही रक्कम तासगाव येथील सराफ माणिक पाटील यांची असल्याचे पोलीस चौकशीत अनिशपन्न झाले.


याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर येथील काही व्यक्तींकडून व्यवसाय संबंधातून दोन कोटी रुपयांची रक्कम घेऊन ती कर्नाटकातील उडपी येथे घेऊन जाण्यासाठी रात्रीच्या वेळी दोन व्यक्ती महागाळा पार्क येथे उभ्या होत्या. रात्रीची गस्त घालणाऱ्या शाहूपुरी पोलिसांना शंका आल्याने, त्यांनी या तरुणांची चौकशी केली. मात्र चौकशीत या रकमेबाबत कोणताच खुलासा हे तरुण करू शकले नाहीत. त्यामुळे सदरच्या रकमेसह पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतले व दोघांनाही आयकर विभागाकडे सोपवण्यात आले असून आयकर विभाग पुढील तपास करीत आहे.



दरम्यान तासगाव सराफ व्यवसाय करणारे माणिक पाटील यांनी प्रतिक्रिया देताना ही संपूर्ण रक्कम अधिकृत असून आपण याबाबत आयकर विभागाकडे खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे.