yuva MAharashtra लोकशाहीचा गळा घोटाणारी ईव्हीएम मशीन यंत्रणा हद्दपार करुन मत पत्रिकेवरच मतदान घ्या - पृथ्वीराज पाटील

लोकशाहीचा गळा घोटाणारी ईव्हीएम मशीन यंत्रणा हद्दपार करुन मत पत्रिकेवरच मतदान घ्या - पृथ्वीराज पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० डिसेंबर २०२
नागरिकांच्या समस्या सोडवणारे, त्यांच्या विकासाच्या योजना राबविणारे राज्यकर्ते निवडून देण्यासाठी संविधानाने जनतेला मताचा हक्क दिला आहे. परंतु दुर्दैवाने ईव्हीएम मशिनवर बटण दाबून दिलेले मत ज्याला दिले त्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला जाते. मशिन हॅक करून मतदाराच्या मताची चोरी केली जाते. स्वातंत्र्य व लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या ईव्हीम मशिनला हद्दपार करून सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्यात असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. सांगली काँग्रेसने आज ईव्हीएम मशिन गो बॅक- स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ केला त्यावेळी ते बोलत होते.

पृथ्वीराज पाटील यांचे मनोगत


आखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएम हटाव - लोकशाही बचाव मोहिमेंतर्गत लाखो सह्यांचे निवेदन मा. राष्ट्रपती, मा.पंतप्रधान. मा. सरन्यायाधीश व मा. मुख्य निवडणूक आयुक्त यांना देण्यात येणार आहे. राज्यभरातून ५ लाख सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.त्यासाठी देशभर ईव्हीएम गो बॅक-स्वाक्षरी मोहीम काँग्रेस पक्षाने सुरु केली आहे.आज सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मित्रमंडळ चौक मेनरोड सांगली येथे ' ईव्हीएम गो बॅक स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना पृथ्वीराज म्हणाले की, 'महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेत मोठे यश प्राप्त झाले असताना आणि विधानसभेला कोणतीही लाट नसताना झालेला पराभव अनाकलनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे. लोकसभेच्या उलटे निकाल कसे काय लागू शकतात. २० नोव्हेंबर आणि २१ नोव्हेंबर रोजी जाहीर मतांमध्ये ७६ लाख मतांची वाढ झाली कशी असा प्रश्न सर्व राजकीय नेते, कार्यकर्ते, पक्ष आणि सर्वसामान्य जनतेला पडला आहे. ईव्हीएम मशिन हॅक होऊ शकते असे जगातील व देशातील अनेक वैज्ञानिकांचे मत आहे. 

अमेरिका, इंग्लड, फ्रान्स, जर्मनी व इतर अनेक देशात मतपत्रिकेवरच मतदान घेतले जाते. यापूर्वी भारतात मतपत्रिकेवरच मतदान होत होते. आताही ते शक्य आहे.ईव्हीएम मशिन्स हटवून मतपत्रिकेवरच सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत अशी महाविकास आघाडी, काँग्रेस व तमाम जनतेची मागणी आहे. सांगलीत आम्ही आज ईव्हीएम गो बॅक - स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे. सांगलीकरांनी लोकशाही व स्वातंत्र्य वाचवण्याच्या या मोहिमेचे जोरदार स्वागत केले आहे. स्वाक्षरी साठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सांगली विधानसभा मतदार संघात व्यापक स्वरूपातही सह्यांची मोहीम राबवून सह्यांचे निवेदन प्रदेश कामेटीकडे तातडीने सादर करण्यात येईल.'

यावेळी बिपीन कदम, गोपाळ पाटील, रामभाऊ पाटील, प्रा. एन्. डी. बिरनाळे, आनंदराव पाटील, मयूर पाटील, तौफीक शिकलगार, मंगेश चव्हाण, विजय आवळे, इलाही बारुदवाले, सागर मुळे, शितल सदलगे, मौला वंटमुरे, श्रीकांत साठे, महावीर पाटील, सनी धोतरे, दादा शिंदे, शहानवाज फकीर, गौस नदाफ, रमेश पाटील, योगेश राणे, प्रशांत माने, इसाक मुल्ला, रविंद्र वळवडे अजिज मेस्त्री, तानाजी रुईकर, प्रसाद गवळी, किरण देवकुळे, विनायक साळसकर, याकूब मणेर, राजेंद कांबळे, संतोष भोसले, डॉ. विक्रम कोळेकर, डॉ.नामदेव कस्तुरे, सत्यजित कराडकर महाराज, प्रशांत अहिवळे, जयंत पन्हाळकर, रज्जाक नाईक, मन्सूर नाईक, सुनिल मोहिते, शबाझ नायकवडी, मनोज पवार, प्रशांत देशमुख, बाबगोंडा पाटील, विठ्ठल कोळी, नाना घोरपडे, अभिजित सुर्यवंशी,
इरफान केडीया, विलास खेराडकर, मनीष साळुंखे, युसुफ जमादार, सहील पैलवान, दीपक गायकवाड, व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकशाही प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.