yuva MAharashtra द. भा. जैन सभेतर्फे आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आ. राहूल आवाडे यांचा सत्कार !

द. भा. जैन सभेतर्फे आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आ. राहूल आवाडे यांचा सत्कार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ डिसेंबर २०२
नुकत्याच नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिरोळ विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून श्री राहूल आवाडे हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत.तसेच महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी मा. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची निवड झाली आहे. त्याबद्दल दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने त्यांचा भव्य जाहीर सत्कार सोहळा श्री अतिशय क्षेत्र कुंजवन उदगाव येथे रविवार दि २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वा. आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मा. भालचंद्र पाटील यांनी केले आहे.