| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ डिसेंबर २०२४
नुकत्याच पार पडलेल्या पोट निवडणुकीत इनाम धामणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदासाठी राजमती प्रकाश मगदूम यांची निवड झाली आहे. इनाम धामणी ग्रामपंचायत येथे झालेल्या मतमोजणीत राजमती प्रकाश मगदूम यांनी नऊ मतें मिळवून आपल्या निकटतम प्रतिस्पर्ध्याला सहा मतांनी मागे टाकले.
नवनिर्वाचित उपसरपंच राजमती प्रकाश मगदूम यांनी आपल्या विजयाबद्दल मतदारांचे आभार मानत आपण गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले. त्यांनी महत्वाची कामे तात्काळ हाती घेण्याची घोषणा केली.
इनाम धामणी ग्रामपंचायतीचे सरपंच अश्विनी अमोल कोळी यांनी राजमती प्रकाश मगदूम यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या असून, दोघी मिळून ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे सांगितले.