yuva MAharashtra लग्नाचा विषय निघाला अन् रोहित पाटील लाजले अन् राज्यातील सर्वात तरुण आमदारानं दिलं भन्नाट उत्तर !

लग्नाचा विषय निघाला अन् रोहित पाटील लाजले अन् राज्यातील सर्वात तरुण आमदारानं दिलं भन्नाट उत्तर !


| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. २ डिसेंबर २०२
दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण आमदार बनले आहेत. अवघ्या २५ वर्षी ते विधानसभेचे सदस्य बनले आहेत. दरम्यान त्यांचं राजकीय कारकीर्द जोमात सुरू झाल्यामुळे त्यांच्या लग्नाचीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनीही तितक्याच चातुर्याने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यांनी दिलेले हे उत्तर सध्या तरुण वर्गात खूपच चर्चेत आहेत.

मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने रोहित पवार यांना, राजकारणात तर सल्ले मिळत जातात पण अतिमहत्त्वाचा सल्ला अजून मिळाला आहे की नाही अजून, असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या लग्नाविषयीचा हा प्रश्न होता. त्यावळे रोहित पवार थोडे लाजले आणि म्हणाले, हा अतिमहत्त्वाचा प्रश्न आम्ही अतिमहत्त्वाच्या घरातील माणसांवर सोडला आहे, असं उत्तर त्यांनी दिलं.


मराठवाड्यातील एक स्थळ आलं होतं, त्यावर त्यांनी त्यांच्या आजीचा एक किस्सा सांगितला. मराठवाड्यातील मुलीचे फोटो आले होते, पण त्यावेळी रोहित पाटील लहान होते. तरीही त्यांच्या आजीने त्या मुलीच्या कुटुंबियांशी चर्चा गमतीदार चर्च केली. त्यांची जमीन किती इतपर्यंत सगळं विचारलं. शेवटी आमचा नातू खूप लहान आहे म्हणून सांगितलं, पण त्यांनीही रोहित मोठा होईपर्यंत थांबायला तयार आहे, असं त्यांनी सांगितलं.

रोहित पाटील यांची आजी म्हणजे आर. आर. पाटील यांची आईचं वय ९० वर्ष आहे, तरीही ती शेतात जाते. कधी वाटलं की आपले नातू किंवा इतर कोणी जरा जास्तच करतायेत तर त्यांना खाली उतरवण्याची ताकदही तिच्यात आहे. ज्यादिवशी माझा विजय झाला, त्यादिवशी आजी आणि आई बाहेरच्या हॉलमध्ये बसली होती. त्यावेळी ती सारखी रडत होती. तिचा एक स्वभाव आहे की, कोणीही भेटायला आलं की तिचा अश्रू आवरता येत नाहीत. ती हळवी आहे आणि तिचेच संस्कार सर्व कुटुंबार आहेत.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पहायला मिळाली. अखेर या मतदारसंघातील निकाल जाहीर झाला असून राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली असून सर्वात तरुण आमदार म्हणून विधानसभेत मतदारसंघाचं नेतृत्व करणार आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षफुटीच्या राजकारणानंतर ही पहिलीच निवडणूक होती. शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांना पहिल्यांदाच उमदेवाही मिळाली होती. अजित पवार गटाने त्यांच्याविरोधात संजयकाका पाटील या दिग्गजाला उमेदवारी दिली होती. पण माजी खासदार संजय काका यांचा पराभव करत रोहित पाटील यांनी एक लाख २६ हजार मत मिळवत आघाडी घेतली. संजयकाका पाटील यांना ९९ हजार मतांवर समाधान मानावं लागलं.