| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. २४ डिसेंबर २०२४
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तिंना ‘प्रतिष्ठा फौंडेशन’च्या वतीने ‘पुरस्कार’ देवून सन्मानीत केले जाते. गेली आठ वर्षे प्रचंड उत्साहात हा कार्यक्रम तासगाव येथे होत आहे. पुरस्काराचे हे ९ वे वर्ष आहे. *रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५* रोजी *तासगाव येथे समृद्धी मल्टी पर्पज हॉल* मध्ये होणाऱ्या *९ व्या प्रतिष्ठा राज्य स्तरीय साहित्य संमेलनात* हा पुरस्कार सोहळा होणार आहे.
* साहित्यरत्न पुरस्कार (साहित्यिकांसाठी)
* ग्रंथरत्न पुरस्कार (सन २०२४ मधील प्रकाशित पुस्तकांसाठी)
* उद्योगरत्न पुरस्कार
* कृषिरत्न पुरस्कार
* प्रशासनरत्न पुरस्कार
* शिक्षणरत्न पुरस्कार
* सुवर्णरत्न पुरस्कार
* समाजरत्न पुरस्कार
* साहित्यरत्न पुरस्कार
* आरोग्यरत्न पुरस्कार
* लोककलारत्न पुरस्कार
* युवारत्न पुरस्कार
* क्रीडारत्न पुरस्कार
असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे हे संमेलन अध्यक्ष आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष *मतानाजीराजे जाधव यांनी केले आहे. इच्छुकांनी आपले प्रस्ताव pratishthafoundation2022@gmail.com या ईमेलवर दि. ७ जानेवारी २०२५ पर्यंत पाठवावेत. जेपीजी अथवा पिडीएफ फाईल पाठवावी. प्रस्ताव शक्यतो दोन पानाचा असावा. अधिक माहितीसाठी तानाजीराजे जाधव यांच्याशी 8237992022 या क्रमांकावर संपर्क करावा.
१) नाव :
२) पत्रव्यवहाराचा पत्ता :
३) जन्म :
४) शिक्षण :
५) संस्था अथवा फर्मचे नाव व पद :
६) आपल्या कार्यक्षेत्रातील कार्य :
७) सामाजिक कार्यातील सहभाग :
८) एक पासपोर्ट अकाराचा फोटो :
या स्वरूपातच माहिती ईमेलवर पाठवावी.