yuva MAharashtra "उजळले भाग्य अमुचे" सांगलीकरांची प्रतिक्रिया, पुष्पराज चौक ते सिव्हिल हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता हॉटमिक्स, इतर रस्ते प्रतिक्षेत !

"उजळले भाग्य अमुचे" सांगलीकरांची प्रतिक्रिया, पुष्पराज चौक ते सिव्हिल हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता हॉटमिक्स, इतर रस्ते प्रतिक्षेत !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ डिसेंबर २०२
पुष्पराज चौक ते झुलेलाल चौक पर्यंतचा मार्ग नेहमी वाहता... या मार्गावर अनेक हॉस्पिटल्स असल्यामुळे नागरिकांची व वाहनांची सतत वर्दळ असते. नुकत्याच झालेल्या पावसाळ्याने सांगली शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली होती. परंतु या रस्त्यांच्या नूतनीकरणाकडे महापालिकेचे निधी अभावी दुर्लक्ष झाले होते. आ. सुधीर गाडगीळ यांनी महाराष्ट्र शासनाकडून यासाठी निधी उपलब्ध करून दिला, परंतु तोपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने, निधी असूनही काम पूर्ण झाली नव्हते. याबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त होत होती. प्रसार माध्यमांनीही महापालिका व लोकप्रतिनिधींवर ताशेरे ओढले होते. विधानसभा निवडणुकीतही प्रचाराचा हा एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता.

निवडणुका संपल्या, आचारसंहिता शिथील झाली आणि पुष्पराज चौक ते सिविल हॉस्पिटल चौक पर्यंतच्या या रस्त्यांचे हॉटमिक्स करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारक व पादचा-यांर्नी समाधान व्यक्त केले असून "उजळले अमुचे भाग्य" अशी प्रतिक्रिया व्यक्त केले आहे.


पुष्कराज चौक ते सिव्हिल हॉस्पिटल चौक पर्यंतच्या रस्त्याचे हॉट मिक्स पद्धतीने काम झाले असले तरी, शहरातील अनेक रस्ते अजूनही खड्ड्यांनी व्यापले आहेत. सध्या या रस्त्यावरील खड्ड्यांचे पॅचवर्क करण्यात आले आहे. मात्र हे पॅचवर्क निष्कृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नागरिकांतून व्यक्त होत आहे. सध्या प्रशासन राज्य असून मा. आयुक्तांनीच आता या पॅचवर्क कामाची पाहणी करावी, व महापालिकेच्या पर्यायाने नागरिकांच्या पैशाचा आपण वेळ होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.