yuva MAharashtra राज्यात पहिल्यांदाच 'पेपरलेस' अन् 'डिजिटल' पध्दतीने होणार हिवाळी अधिवेशन !

राज्यात पहिल्यांदाच 'पेपरलेस' अन् 'डिजिटल' पध्दतीने होणार हिवाळी अधिवेशन !


| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. ८ डिसेंबर २०२
येत्या १६ डिसेंबरपासून राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे. हे अधिवेशन केवळ एक आठवड्याचं असंल, तरी अनेक अर्थानी खास असणार आहे. महाराष्ट्रातील पहिलं डिजिटल विधिमंडळ अधिवेशन नागपुरात होणार आहे. विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील प्रत्येक आमदारांच्या आसनासमोर एक डिजिटल स्क्रीन बसवण्यात आली आहे. त्यामुळे आता आमदारांना सभागृहात डिजीटल पध्दतीने कामकाज करता येणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे अखेर पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. नव्या सरकारचं विधिमंडळाचं पहिलंचं हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. साधारणतः एक आठवड्याचे कामकाज निश्चित झाले असून, या अधिवेशनाचं कामकाज डिजिटल पध्दतीने केले जाणार आहे. आमदारांच्या आसनासमोर असलेल्या टेबलवर लॅपटॉप बसवण्यात आले आहेत. अधिवेशनाबाबतच्या कामकाजासंदर्भातील सर्व माहिती यात दिसणार आहे. डिजिटल पध्दतीनं होणारं महाराष्ट्रातील हे पहिलं अधिवेशन असणार आहे.


यावर्षी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पेपरलेस करण्यासाठी युध्दपातळीवर यंत्रणाही काम करत आहे. दोन्ही सभागृहात आमदारांच्या बैठकीसाठी नवी व्यवस्था करण्यात आली आहे. आमदारांच्या टेबलवर लॅपटॉप बसवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदापासून पेपरलेस काम सुरू होईल.

जेव्हा विदर्भ अखंड महाराष्ट्रात सामील झाला तेव्हा, विदर्भातील प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकार किमान एक महिना नागपुरात येईल आणि या भागातील प्रश्नांना प्राधान्य क्रमाने सोडवेल, कशी होत नागपूर करारात ठेवण्यात आली आहे. त्यानुसार प्रतिवर्षी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. अर्थात विदर्भवासियांकडून या हिवाळी अधिवेशनाबाबत नेहमीच आरोप होतो की, हे हिवाळी अधिवेशन केवळ औपचारिकता म्हणून निभावलं जातं. या अधिवेशनातील कोणत्याच निर्णयाला गांभीर्याने घेतले जात नाही. 

दरम्यान या डिजिटल अधिवेशनाची चर्चा आणि उत्सुकता केवळ विदर्भवासियालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला लागून राहिली आहे.

बातमी व फोटो सौजन्य : दै ललकार, सांगली.