| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ डिसेंबर २०२४
सांगली मिरज भागाकडून हजारोंच्या संख्येने नाईकबा या कुलदैवत अस भाविक जात असतात 1996 97 पासून या मार्गावर सांगली नाईकबा एसटी सेवा सुरू होती परंतु मध्यंतरी ती काही कारणाने बंद झाली ही एसटी सेवा सुरू करणे बाबतचे निवेदन विभागीय वाहतूक अधिकारी श्री विजय मोरे साहेब यांना प्राध्यापक प्रकाश पाटील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर पाटील श्री श्रीकांत पाटील यांनी दिले.
या एसटी बाबतची मागणी सातत्याने होत असल्याने याबाबतची गरज ओळखून मोरे साहेब यांनी सुरुवातीला प्रत्येक रविवारी सांगली नाईकबा एसटी सुरू होणार असल्याबाबतचे आश्वासन दिले सदर एसटी सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा या एसटी सेवेमुळे भाविकांची खूप सोय होणार आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा अंतर्गत तासगाव विटा मार्गावर चिंतामणी नगर बस थांबा निर्माण व्हावा, अशी मागणीही प्रा. प्रकाश पाटील यानी केली आहे. सांगलीहून बुधगाव तासगाव विटा या मार्गावर शिक्षण नोकरी व्यवसाय या कारणाने अनेक लोक दररोज प्रवास करतात या मार्गावर चिंतामणी नगर हा एसटी साठी विनंती थांबा केल्यास कलानगर, पंचशील नगर, चिंतामण नगर राजनगर यशवंत नगर अशा शहराच्या विविध भागातील उपनगरात राहणाऱ्या लोकांना प्रवास करणे सोयीस्कर होईल. ही बाब विचारात घेऊन चिंतामण नगर नवीन रेल्वे पुलाच्या जवळ एसटी थांबा करून प्रवाशांचे सोय होणे बाबतचे निवेदन विभागीय वाहतूक अधिकारी श्री विजय मोरे साहेब यांना प्राध्यापक प्रकाश पाटील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर पाटील श्री श्रीकांत पाटील यांनी दिले मोरे साहेब यांनी चिंतामण नगर रेल्वे पुलाजवळ उत्तर बाजूस एसटी थांबा करणे बाबत सकारात्मक विचार करून असे आश्वासन दिले आहे.