yuva MAharashtra मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल कामगाराचा खून; सांगलीतील धक्कादायक घटना, दोघे हल्लेखोर ताब्यात !

मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल कामगाराचा खून; सांगलीतील धक्कादायक घटना, दोघे हल्लेखोर ताब्यात !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ डिसेंबर २०२
मध्यरात्रीच्या सुमारास दोन जणांनी मिळून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरवर धारधार शास्त्राने वार करत हत्या केल्याची घटना सांगलीतील हरिपूर रोडवर घडली आहे. या घटनेत हत्या करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून खून कोणत्या कारणाने केला याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सूरज अलिसाब सिदनाथ असे घटनेत मृत्यू झालेल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराचे नाव आहे. सदर खुनाची घटना हि सांगली- हरिपूर रस्त्यावरील तेलंगकृपा बंगल्यासमोर रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. यात हॉटेल कामगारांवर दोघा हल्लेखोरांनी सूरज याच्या डोक्यावर, गळ्यावर, छातीवर, खांद्यावर, पोटावर, पाठीवर धारधार हत्याराचे २२ वार करण्यात केले आहेत. दरम्यान अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस यंत्रणेकडून वर्तविण्यात आला.


घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण चौगुलेसह वरिष्ठ पोलीस अधिकऱ्यांनी भेट दिली. घटनास्थळी मयत सुरजची दुचाकी आणि मोबाईल सापडला आहे. मयत सूरज हा हरिपूर येथील संगम हॉटेल येथे वेटर काम करत होता. घटनेचा पंचनामा करत पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे. 

दोघे संशयित हल्लेखोर ताब्यात 

सदरच्या घटनेनंतर सहायक पोलिस निरीक्षक स्वामी आणि पीएसआय दीपक गायकवाड यांनी घटनेतील दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र हे दोघेही संशयित अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान खुनाचा प्रकार पाहता हत्या करण्यामागचे कारण वेगळे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.