yuva MAharashtra राष्ट्रीय लोकअदालतमध्ये २४२३ प्रकरणे निकाली, 32 कोटी 94 लाख 46 हजार रु. वसूल !

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये २४२३ प्रकरणे निकाली, 32 कोटी 94 लाख 46 हजार रु. वसूल !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ डिसेंबर २०२
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार सांगली जिल्हयामध्य सर्व तालुक्यामध्ये दि. १४/१२/२०२४ रोजी मा.श्री. पी.के. शर्मा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांचे मार्गदर्शनाखाली महालोकअदालत आयोजन करणेत आले होते.

लोकअदालत दिवशी श्री. पी. बी. जाधव, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सांगली, यांनी उपस्थित पक्षकारांना जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून घेवून आपला मोलाचा वेळ व पैसा वाचविण्याचे आवाहान केले. यावेळी मा. श्री.एस. आर. पडवळ, जिल्हा न्यायाधीश ३, मा. श्री. डी. वाय. गौड, अति. जिल्हा न्यायाधीश क. ४ हे देखील उपस्थित होते तसेच सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण रजपूत हे ही उपस्थित होते.


लोक अदालतमध्ये सांगली जिल्हयातील ११६९ दावापूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली करणेत आली. तसेच सर्व न्यायालयातील मिळून १२५४ प्रलंबीत प्रकरणे अशी एकूण २४२३ प्रकरणे निकाली करणेत आली, तसेच सदर लोकअदालतमध्ये सांगली जिल्हयातून एकूण रक्कम रुपये ३२,९४,४६,४०६ रु. इतक्या रक्कमेची वसूली करणेत आली.

सदर लोक अदालतमध्ये सांगली मुख्यालय येथे पॅनेलप्रमुख म्हणून मा. श्री. एस. आर. पडवळ, जिल्हा न्यायाधीश ३ व मा. श्री. डी. वाय. गौड अति. जिल्हा न्यायाधीश क. ४. श्री एम.एम.राव, श्री. ए.बी. शेंडगे, श्रीमती एन. के. पाटील, श्री. व्ही.डी. घागी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सांगली, श्री. व्ही. व्ही. पाटील, श्री.डब्लू ए. सईद, श्रीमती आर.एस. पाटील, श्रीमती एस.एच. नलवडे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सांगली तसेच मा. श्री. डी.एस. पाटील औद्योगिक न्यायालय व मा. श्री. एस.ए. उपाध्ये, निवृत्त न्यायाधीश, सांगली यांनी काम पाहिले. तसेच कन्सिलिएटर म्हणून ॲड. जे. व्ही. नवले, ॲड. मुक्ता दुबे ॲड. फारूक कोतवाल, अॅड मोहन कुलकर्णी, ॲड. विक्रांत वडेर, डॉ. पूजा नरवाडकर, ॲड. अमित पाटील, ॲड. अमोल डोंबे, ॲड. श्रीमती स्वाती गौड, ॲड. एस. एम. पखाली, ॲड. प्रशांत सोमण, ॲड. सचिन गायकवाड पॅनेल ॲड. यांनी काम पाहिले.


सदरचे लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडणेसाठी श्री. गि.ग. कांबळे - सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांनी संपूर्ण लोकअदालतीचे नियोजन केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक नरहरी दांडेकर तसेच प्रफुल्ल मोकाशी, नितीन आंबेकर, विजय माळी, गौस नदाफ उपस्थित होते. सदर लोकअदालतचेवेळी पक्षकारांचा सहभाग मोठया प्रमाणात होता.


पुढील राष्ट्रीय लोकअदालत दि. २२ मार्च २०२५ रोजी आयोजित करणेत येणार असून पक्षकारांनी यामध्ये सहभाग घेवून आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली तर्फे करण्यात येत आहे.

बातमी व फोटो सौजन्य: अभिजित शिंदे, सांगली.