yuva MAharashtra लातूर मधील 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण !

लातूर मधील 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण !


| सांगली समाचार वृत्त |
लातूर - दि. ८ डिसेंबर २०२
देशभरातील अनेक मंदिरावर आणि खाजगी जागांवर तसेच शेत जमिनीवर वक्फ दावा ठोकण्याचा सिलसिला कायम असून, वक्फ बोर्डाच्या कायद्यामुळे याबाबत न्यायालय हस्तक्षेप करू शकत ना सरकार. आणि म्हणूनच सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकच आता लातूर जिल्ह्यातील तळेगाव या गावातील 103 गावकर यांच्या तब्बल 300 एकर शेतीवर वक्फ दावा सांगितल्याने सर्वत्र खळबळ माजली असून, संबंधी शेतकऱ्यांप्रमाणेच इतर शेतकरी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही महिन्यापूर्वीच कर्नाटकातील विजयपूर येथील शेकडो एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितल्याने वक्फ बोर्ड व संबंधित शेतकऱ्यात वाद सुरू आहे. अशातच तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर महाराष्ट्र राज्य व वक्फ बोर्डाने औरंगाबादच्या न्यायालयात याचिका क्रमांक 172024 अन्वये हा दावा केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी एकत्रित येत, आता वक्फ बोर्डाच्या या निर्णयाविरुद्ध उत्तर देण्याचे ठरवले आहे. गेल्या तीन चार पिढ्यापासून संबंधित शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेली ही जमीन जाणार या भीतीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यंतरी केंद्र सरकारने वक्फ बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप त्याच्यावर कारवाई होऊ शकली नाही. तत्पूर्वी वक्फ बोर्ड अनेक ठिकाणच्या मंदिर, खाजगी जागा व शेतजमिनीवर हक्क सांगत सुटल्याने, समाजातूनही याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

फोटो सौजन्य : गुगल स्त्रोत