yuva MAharashtra मदनभाऊंच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करूया जयश्री मदन पाटील; कुपवाड येथे पदयात्रा आणि प्रचार बैठका संपन्न !

मदनभाऊंच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करूया जयश्री मदन पाटील; कुपवाड येथे पदयात्रा आणि प्रचार बैठका संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ नोव्हेंबर २०२
माझी लढाई भाजपला उलथवून लावण्यासाठीच आहे, सध्याच्या आमदारांनी दहा वर्षांत विधानसभेत एकही प्रश्न विचारला नाही. सांगलीत चार हजार कोटींची कामे केली, तरीही सांगली भकास आहे. कार्यकर्ते आणि सांगलीकरांनी ही निवडणूक हाती घेतली आहे. त्यामुळे स्वर्गीय मदन भाऊंच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करूया. सांगली शहरासह ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे महिला अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी कुपवाड येथील आयोजित पदयात्रा व प्रचार बैठकीत सांगितले.

यावेळी अण्णासो उपाध्ये शाळेपासून पदयात्रेची सुरुवात झाली. दर्गा चौक, चावडी परिसर, जैन गल्ली, आमदार गल्ली, महापालिका रोड, शिवनेरी नगर येथून पदयात्रा निघाली. या पदयात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी आठ नंबरावरील 'हिरा' या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.


यावेळी बोलताना पुढे जयश्री मदन पाटील म्हणाल्या की, लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही दादा घराण्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे विधानसभेला कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले. गेल्या ४० वर्षांनंतर सांगलीला महिला आमदार निवडण्याची संधी निर्माण झाली आहे. त्या संधीचे येथील नागरिक व महिला नक्कीच सोने करून दाखवतील. 

यावेळी चेअरमन प्रमोद पाटील, संजय पाटील, नरसगोंडा पाटील, सुमित पाटील, कुमार लोकपुरे, अनिल पाटील, नितीन लोकपूरे, देशभुषण करणारे, कुलभूषण कर्नाळे, सचीन पाटील, कुमार पाटील, आश्विन पाटील, बशीर मुजावर यांच्यासह मदनभाऊ गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.