| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ नोव्हेंबर २०२४
सांगली विधानसभा मतदार संघात मोठी चुरस पहावयास मिळत आहे. येथे काँग्रेस आणि भाजपमध्ये बंडखोरी झाली असून, काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील आणि भाजपचे श्री. पप्पू डोंगरे हे दोघेही बंडखोरीवर ठाम आहेत. तर दोन्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार, श्री. पृथ्वीराज बाबा पाटील व श्री. सुधीरदादा गाडगीळ या दोघांनाही बंडखोर उमेदवार आपली बंडखोरी मागे घेतील असा विश्वास आहे. त्यामुळे जर सांगली विधानसभा मतदारसंघात श्रीमती जयश्रीताई पाटील व श्री. पप्पू डोंगरे या दोघांचीही उमेदवारी कायम राहिली, तर त्याचा नेमका फटका कोणाला बसणार ? अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे ताकद मोठी आहे. तरीही अंतर्गत वादामुळे आणि एकमेकांचे पाय खेचण्यामुळे ही ताकद विभागली जाते. परिणामी काँग्रेसचा हा बालेकिल्ला ढासळत चालल्याचे चित्र पाहावयास मिळते. (स्व.) वसंतदादांच्या हयातीतच (स्व.) विष्णूअण्णा पाटील यांच्या पराभवाने काँग्रेसच्या या बालेकिल्लाला प्रथम सुरूंग लागला. विशेष म्हणजे या सुरुंग वात कोणती ती काँग्रेस अंतर्गत वादाची... त्यानंतर दिनकरतात्या पाटील यांनी हा किल्ला काबीज केला. मात्र त्याबद्दल येथे कधी अपक्ष तर कधी भाजपाने येथे झेंडा रोवला.
आणि म्हणूनच येथे काँग्रेसच खऱ्या अर्थाने काँग्रेसचा विरोधक आहे. सध्या याचीच प्रचिती दिसून येत आहे. श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरून पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या समोर आभार उभे केले आहे. मतदार संघात ताकद मोठी आहे. परिणामी त्याच्या बंडखोरीचा फायदा त्यांना स्वतःला होणार की सुधीर दादा गाडगीळ याला... असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण गत विधानसभा निवडणुकीत मिळालेले अपयश पचवून पृथ्वीराज बाबा पाटील यांनी गेली पाच वर्षे येथे प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत मतदारात सहानुभूती म्हणण्यापेक्षा आपुलकी दिसून येत आहे. परंतु श्रीमती जयश्रीताई पाटील यांचे मते निर्णायक ठरणार आहेत.
दुसरीकडे सांगली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामे व त्यांचा स्वच्छ चेहरा ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र तरीही त्यांच्या बाबत मतदार संघात 'तळ्यात मळ्यात' असलेल्या मतदारांची भूमिका प्रश्नचिन्ह उभे करू शकते. अशाचच शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी त्यांच्यासमोर आव्हान पुढे केले आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी आणि मतदारसंघात त्यांचा असलेला दबदबा हा सुधीरदादांना गोत्यात आणू शकतो.
श्रीमती जयश्रीताई पाटील व श्री पप्पू डोंगरे यांच्या मतांमुळे होणारे ध्रुवीकरण नेमके कोणाच्या पथ्यावर पडते, याचा फायदा पृथ्वीराजबाबा पाटील यांना होणार की सुधीरदादा गाडगीळ यांना हे चार नोव्हेंबरला कोण माघारी घेते ? दोघाही बंडखोरांपैकी जो माघारी घेईल, त्यांची ताकद नेमके कोणाच्या पाठीशी उभी राहते ? या प्रश्नचिन्हांच्या गुंत्यात याचे उत्तर अडकलेले दिसते. आणि म्हणूनच 'जर तर' गृहीते पृथ्वीराजबाबा आणि सुधीरदादा यांच्या विजयासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.