yuva MAharashtra मिरज शहरात मतदार संवाद रॅलीचे आयोजन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मिरज शहरात मतदार संवाद रॅलीचे आयोजन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ९ नोव्हेंबर २०२
मिरज विधानसभा अंतर्गत मिरज दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजता मतदार संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीच्या सुरुवातीस मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका उपायुक्त मा. विजया यादव, सहाय्यक उपायुक्त अनिस मुल्ला, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, बाल विकास प्रकल्प अधिकारी पूजा कणसे, स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, राष्ट्रीय खेळाडू संस्कार सचिन वाळवे, श्रावणी कदम, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष यशवंत जाधव व इतर दिव्यांग कर्मचारी, बेघर स्वयंसेवी संस्थेचे शाहीन शेख , प्रमोद माळी, वसंत भोसले, अंगणवाडी, बचत गट, तहसील कार्यालय महानगरपालिका व पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

ही रॅली महानगरपालिका, लक्ष्मी मार्केट, हायस्कूल रोड, नदी वेस, शास्त्री चौक, कोल्हापूर रोड, वखार भाग, दर्गा परिसर या कमी मतदान असणाऱ्या भागात काढण्यात आली. मतदार संवाद यात्रेस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मा. विजया यादव मॅडम यांनी युवा, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ व इतर मतदारांशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले.


यावेळेस मतदारांना आवाहन पत्रांचे वाटप करण्यात आले. दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष श्री यशवंत जाधव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह बाईक सह रॅलीत सहभाग नोंदवला. रॅलीचे आयोजन स्वीप नोडल अधिकारी श्री गणेश भांबुरे यांनी केले