| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ नोव्हेंबर २०२४
सोने खरेदी विक्रीचे दर ठरवण्याचा बुलियन मार्केट मोदींनी गुजरातला नेला. हिऱ्याचा व्यापार गुजरातला नेला आणि सांगली जिल्ह्य़ातील सुवर्णकार व गलाई व्यावसायिकांचा गळा घोटण्याचे महापाप मोदी शहा करत असताना सांगलीचे आमदारांनी विधानसभेत ब्र शब्द काढला नाही. सांगलीसाठी कांहीच न करणाऱ्या अकार्यक्षम आमदाराला आता घरी बसवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी माझ्या हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्या. मी आपल्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली. दैवज्ञ समाज संस्था सांस्कृतिक भवन गवळी गल्ली येथे झालेल्या मिटिंग ममध्ये ते बोलत होते. या बैठकीत दैवज्ञ हितवर्धक समाज, दैवज्ञ ब्राम्हण समाज, सांगली जिल्हा सराफ असोसिएशन आणि सांगली शहर सुवर्णकार संघटना यांनी पृथ्वीराज पाटील यांना पाठिंबा दर्शक पत्रे दिली.
यावेळी बोलताना पृथ्वीराज म्हणाले, 'गेली पाच वर्षे मी अहोरात्र सांगलीसाठी राबलोय, पुन्हा तुमच्यासाठी मला आमदार म्हणून पाच वर्षे द्या. सोन्याचा व्यवसाय धोक्यात आणलेल्या भाजपा व विद्यमान आमदारांचा खरा चेहरा उघडा केल्याशिवाय गप्प बसणार नाही.
याप्रसंगी जितेंद्र पेंडुरकर,सावकार शिराळे, अशोक व राजश्री मालवणकर, रणजित जोग, मुकुंद पेडणेकर, प्रितम रेवणकर, सैफल पावसकर, प्रसाद रेवणकर, गणपती कुर्णेकर, हर्षद बेलवलकर व दैवज्ञ समाज सुवर्णकार, गलाई व सराफी व्यावसायिक उपस्थित होते.